दुष्काळी परिस्थितीत
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी
- पालकमंत्री जयकुमार गोरे
ॲग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर : दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीचे शासनाने सरसकट पंचनामे केले असून, शेतकऱ्यांना दिवाळी सण साजरा करता यावा, यासाठी दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रिम आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला. दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
रेडे्डे (ता. मंगळवेढा) येथील नागरिकांशी संवाद साधताना पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते.यावेळी आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन, उपविभागीय अधिकारी अमित माळी, तहसीलदार मदन जाधव यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्री गोरे म्हणाले, ‘‘तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी तांत्रिक बाबींचा आधार घेऊन दुष्काळी उपाययोजनांच्या अंमलबजावणीत अडथळे निर्माण करू नयेत. शेतकरी आणि नागरिकांच्या वेदना समजून घेऊन अधिक संवेदनशीलतेने काम करावे. पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये किमान २४ ते ४८ तासांच्या आत टँकर सुरू करावेत. गावातील प्रत्येक वाडी-वस्ती आणि गल्लीपर्यंत टँकर पोहोचेल, याची दक्षता घ्यावी.’’ गावातील रस्ते ची परिस्थिती लक्षात घेऊन मोठा किंवा लहान टँकर उपलब्ध करून द्यावा. दुष्काळी परिस्थितीत एकही तलाठी अथवा ग्रामसेवक मुख्यालय सोडून जाणार नाही, याची जिल्हा प्रशासनाने काळजी घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच गावातील पशुधनाची संख्या लक्षात घेऊन जनावरांसाठीही पुरेसा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे. चारा उपलब्धतेबाबत प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात. राज्यातील चारा डेपो, चारा छावण्या सुरू करणे किंवा शेतकरी व पशुपालकांना चारा खरेदीसाठी अनुदान देणे याबाबतचा प्रश्न आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मांडून तो मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाहीही पालकमंत्री गोरे यांनी दिली. यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती दिली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी जनावरांसाठी पिण्याचे पाणी व चारा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
-----पूर्ण-----
--- फोटो B09738 ---
रेड्डे : येथील माने कुटुंबीयांसोबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिवाळी साजरी केली. त्यावेळी फराळ, आहेर व लहान मुलांना कपड्यांचे त्यांनी वाटप केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.