पुणे

मिरासदार यांच्या समग्र साहित्य संचाचे प्रकाशन कथांच्या अभिवाचनासह मान्यवरांनी जागवल्या ‘दमां’च्या आठवणी

CD

पुणे, ता. २ : ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आणि पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या साहित्यिक आठवणींना उजाळा देत त्यांच्या समग्र साहित्याच्या ग्रंथसंचाचे प्रकाशन करण्यात आले. मिरासदार यांच्या खास नर्मविनोदी शैलीतील कथांचे अभिवाचन झाल्याने साहित्यप्रेमींना त्यांच्या लेखनाचा पुन्हा अनुभव घेता आला.
‘मेहता पब्लिशिंग हाऊस’तर्फे आयोजित या कार्यक्रमास ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पुणे पुस्तक महोत्सवाचे संस्थापक राजेश पांडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह सुनेत्रा मंकणी, प्रसाद मिरासदार, मेहता पब्लिशिंग हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक अखिल मेहता, नुपूर मेहता आदी उपस्थित होते.
यावेळी मंगला गोडबोले यांनी द. मा. मिरासदार यांच्या साहित्यिक आठवणींना उजाळा दिला. गोडबोले म्हणाल्या, ‘‘कथाकार म्हणून मिरासदार प्रसिद्ध होतेच; मात्र त्यांचा कथाकथनकार म्हणून अनुभवही तितकाच प्रभावी होता.’’ यावेळी त्यांनी मिरासदार यांच्या कथाकथनातील शैली आणि सादरीकरणाच्या आठवणी सांगितल्या. तर जावडेकर यांनी द. मा. मिरासदार, शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथाकथनाच्या कार्यक्रमांच्या आठवणी सांगितल्या.

पांडे म्हणाले, ‘‘आजच्या काळात हास्य फार महाग झाले आहे. अशा वेळी कथा अभिवाचनासारखे उपक्रम राबविणे गरजेचे आहे.’’ या वेळी सुनेत्रा मंकणी यांनी ‘बुजगावणं’ या कथेचे, तर प्रसाद मिरासदार यांनी ‘ड्रॉइंग मास्तरांचा तास’ या कथेचे अभिवाचन केले. मिरासदार यांच्या नर्मविनोदी शैलीतील या कथांनी उपस्थित साहित्यप्रेमींच्या आठवणी जाग्या केल्या. डॉ. विनया केसकर यांनी सूत्रसंचालन केले.
--------------
फोटो ः 54673

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

Asian Games, IND vs PAK: भारताने पाकिस्तानला पार चारी मुंड्या चित करत जिंकले GOLD! सलग दुसऱ्यांदा सुवर्णकामगिरी

SCROLL FOR NEXT