Street school
Street school Sakal
पुणे

Dadachi Shala : रस्त्यावरच्या शाळेला मिळालं चार भिंतीचं हक्काचं घर

सकाळ डिजिटल टीम

- आश्विनी वाघमारे

पुणे : अभिजीत पोखरणीकर याच्या संकल्पनेतून रस्त्यावरील मुलांसाठी भरणारी शाळा आता इमारतीमध्ये भरणार आहे. माईंचा वारसा घेऊन दादाच्या शाळेला नवे युग आले आहे. तीन वर्षाच्या अथक परिश्रमानंतर आकुर्डी आणि पाठोपाठ कात्रज येथे शाळेला जागा भेटली. हा प्रवास आता सोयीस्कर झाला असला तरी तो तितकाच जबाबदारीपुर्ण झाला आहे. काल पुण्यामध्ये कात्रज भागात दादाची शाळेचे उद्घाटन झाले त्या निमित्ताने घेतलेला हा आढावा.

एकीकडे कोरोंना काळात आपण आपल्या घरात बसून असताना ह्या तीन पोरांना रस्त्यावरील मुलांसाठी काही तरी सुचावं, ते त्यांनी प्रत्यक्षात उतरावं, त्यांना त्यात यश यावं आणि काय हवं? अभिजीत पोखरनिकर, अमोल शिंदे, शुभम माने ह्या मुलांनी हाती घेतलेला प्रकल्प यशाची शिखरं गाठतं असताना काय अडचणी आल्या हे जाणून घेऊया.

तीन वर्षांचा प्रवास, तीन वर्षाची मेहनत, तीन वर्षाचे सातत्य तीन वर्ष शिक्षणाचा ध्यास घेऊन अशा वळणावर आली आहे. जिथे थांबून आताची पिढी आणि नंतर येणारी पिढीला ‘दादाची शाळा’ एक उज्वल भविष्य देऊ शकेल. समोर हसरे दृश्य दिसत असले तरी त्याच्या, मागच्या बाजूला भरपूर संघर्ष आहे.

आजवर फुटपाथ आणि झोपडीमध्ये भरणारी शाळा आता सुसज्ज इमारती मध्ये भरणार. ‘देणारयांने देत जावे, घेणारयाने घेत जावे’... शिक्षणाचा वसा हाती घेऊन जो उपक्रम या नविन पिढीने आपल्या समोर आणला आहे तो कौतूकास पात्र असाच आहे.

कोरोनाच्या काळात आपण घरात बसलेले असताना पुण्यातील काही यंग स्टार पिढीने रस्त्यावरील मुलांना सगळे नियम पाळुन शिकवायला सुरुवात केली. आणि आता हयाच शाळेला चार भिंतीच घर मिळतयं....हे सोप नक्की च नव्हत..

‘पाठीवरती हात ठेवूनी फक्त लढ म्हणा’, असं म्हणत ‘दादाची शाळा’ गेली तीन वर्षापासुन रस्त्यावरील पदपथावर राहणाऱ्या पथरीक व गरीब परिस्थिति मध्ये राहणाऱ्या मुलाना शिक्षण देत आहे. मार्केट यार्ड, सारसबाग, विश्रांतवाडी, आणि झेड ब्रीज च्या खाली नदीपात्रात ही शाळा भरते... भारतीय संविधानाला मनात न ठेवता कृतीत उतरविण्याचा प्रयत्न करत, या कल्पनेतून सुरुवातीला रस्त्यावर राहणाऱ्या आणि शिक्षणा पासून कोसो दूर असलेल्या जगण्यासाठी पैसे मागायला सरसावणाऱ्या हातावर पाटी पेन्सिल ठेवली.

बघता बघता सतराशे कोऱ्या पाटीवर आनंदाने श्री गणेशा गिरवायला लागतात आणि त्यांना खऱ्या अर्थाने जीवनाचा वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ समजू लागतो. आणि हे सगळ करत असताना सोबतींला असंख्य हाताचा बळ मिळाव. एकीकडे कोणत्यातरी पक्षाच्या झेंड्याच्या नावावर नेत्याकडे खाण्यापिण्यात “सो कॉल्ड कार्यकर्ता ” म्हणून वाहवत जाणारी पिढी, आणि दुसरीकडे नवख्या वयात एवढ्या मोठ्या प्रकल्पाचा धनी बनणारा तू यावरून, माणुसकी अजूनही ही शिल्लक आहे यावर विश्वास ठेवायाला भाग पाडतो.

आकुर्डी शाखा - रोपट्याच रूपांतर कल्पवृक्षात होण्याचा मार्ग सर करत असताना लोकांनी केलेली मदत शाळेसाठी दिलेली जागा, दिलेले सामान या साठी दादाची शाळा यांची टीम सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करते.

वन बुक फॉर नेशन बिल्डिंग – ‘वाचाल तर वाचाल’ अस म्हणल जात परंतु सगळ्यानाच हे शक्य होत अस नाही . म्हणून दादांची शाळा या माध्यमातून आपण कात्रज शाखेत एक वाचनालय सुरू करत आहोत . या वाचन चळवळी आपला देखील मोलाचा सहभाग हवा आहे. तेव्हा तुमच्या कडील वाचून झालेली पुस्तक आपल्या कडील वाचनापासून वंचित असलेल्या मुलांना नक्की द्यावेत. असे आवाहन ‘दादा ची शाळा’ कडून करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

Bhandup Cash: पैशाने भरलेली व्हॅन जप्त, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई

Yoga Tips : मानसिक आरोग्यासाठी अन् शारिरीक तंदूरूस्तीसाठी फायदेशीर आहेत 'ही' योगासने, दररोज करा सराव

SCROLL FOR NEXT