dadu-indurkar 
पुणे

वगसम्राट दादू इंदुरीकरांचे महाराष्ट्राला विस्मरण

गणेश बोरुडे

तळेगाव स्टेशन - जसराज थिएटरच्या 'गाढवाचं लग्न` या वगनाटयातील सावळया कुंभाराची भूमिकेमुळे लोककलेतील हिरा ठरलेले वगसम्राट दादू इंदूरीकर मावळच्या भूमीत जन्मले याचा महारष्ट्रासह स्थानिकांनाही विसर पडल्याचे चित्र आहे. लोककलावंतांना प्रेरणादाई ठरावा असा दादू इंदोरीकरांचा जीवनप्रवास अद्यापही दुर्लक्षितच आहे.

वगसम्राट दादू इंदूरीकर उर्फ दादू राघु सरोदे म्हणजे तमाशाच्या फडावरील एक हरहुन्नरी, अष्टपैलू आणि बहुआयामी कलाकार. पुणे जिल्हयातील मावळ तालुक्यामध्ये तळेगाव-चाकण रस्त्यावरील इंद्रायणी नदीकाठी इंदूरीमध्ये जन्मलेल्या दादूंचे शिक्षण अवघे सातवीपर्यंत. लहरी बाबाच्या आशीर्वादाने आणि कलगी-तुऱ्यातले ख्यातीप्राप्त कलाकार वडील राघोबांच्या मार्गदर्शनाखाली विकसित झालेली दादू इंदुरीकरांमधील सोंगाड्याची अभिजात कलाकारी तमाशा कलावंतासाठी प्रेरणादाई ठरावी अशीच आहे. वडिलांच्या निधनानंतर काढलेला वीस वर्षाचा तमाशा फड जळाल्यानंतर आर्थिक अडचणीत सापडलेले दादू शेवटपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करत राहिले. जसराज थिएटरच्या 'गाढवाचं लग्न` या वगनाटयातील दादू इंदूरीकर यांची सावळया कुंभाराची भूमिका त्यांना अजरामर करुन गेली. याबरोबरच आतून कीर्तन वरून तमाशा, राणी अहिल्याबाई होळकर तसेच मिठ्ठाराणी वगनाटयामधील त्यांच्या भूमिका मराठी रसिकांच्या मनात कायम कोरल्या गेल्या. पठ्ठे बापूराव, राघु इंदूरीकर, भाऊ फक्कड, शिवा संभाने पाया घातलेल्या तमाशा कलेचा कळस दादू इंदुरीकरांनी चढवला असे म्हणायला हरकत नसावी इतपत लोकनाट्य क्षेत्राला लोकप्रियता आणि विकासाद्वारे संपन्नता मिळवून देण्यात त्यांचे लाखमोलाचे योगदान आहे. 

दादा कोंडके यांनी सोंगाड्या चित्रपटातील भूमिका दादूंकडूनच आत्मसात केली होती. एक विनोदी कलाकार, उत्तम ढोलकीवादक, सोंगाड्या, विनोद वीर ते शाहीर असे दादू इंदुरीकर मराठी लोकनाट्यात ठसा उमटून गेले. भारत सरकारने १९७३ साली त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कुठलेही नैपथ्य,सोंगाड्याच्या भूमिकेद्वारे खळखळून हसवत प्रेक्षकाला दुःख, दारिद्रय दैन्य विसरायला लावणाऱ्या दादोबांना कला आणि व्यवहाराची सांगड कधीच घालता आली नाही. आयुष्याच्या शेवटच्या काळात आर्थिक दारिद्रयामुळे अतिशय दयनीय हाल अपेष्ठा नशिबी आलया. आज १३ जूनला ३८ व्या स्मृतिदिनी देखील दादू इंदोरीकरांच्या जन्मगावी त्यांचे साधे स्मारकही अद्याप होऊ शकलेले नाही. अशा या बहुआयामी कलाकाराचा महाराष्ट्र शासनासह स्थानिकांनाही विसर पडलेला दिसतोय ही बाब खेदजनक आहे.आजपावेतो अनेक नेते पुढाऱ्यांनी इथे येऊन नुसत्या घोषणा आणि आश्वासने दिली मात्र पुढे काहीच नाही. इंदुरीमध्ये दादूंच्या स्मरणार्थ लोककला लोककला, लोकसाहित्य आणि तमाशा कला प्रशिक्षण केंद्र विकसित केल्यास निखळ लोकरंजनाची कला त्यांच्या नावाने अखंडित राहील.

आजच्या आधुनिक युगात अनेक मनोरंजनाची साधने आली असली तरी, खळखळून हसविणारे सोंगाडपण करणारा कुणी नसल्याने मानवी जीवनातील दुःख,दारिद्रय दैन्य वाढत चालले आहे.दादू इंदोरीकरांच्या जन्मभूमीत लोककला प्रशिक्षण केंद्ररुपी स्मारक व्हायला हवे."
-प्रभाकर ओव्हाळ (लोकसाहित्याचे अभ्यासक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Praniti Shinde: निवडणूक आयोग आणि भाजप यांचे साटेलोटे : खासदार प्रणिती शिंदे; भाजपवर घाणाघात, नेमकं काय म्हणाल्या ?

Jayant Patil : 'रंग बदलनेवालों को बाद में देखेंगे'; हिशेब सगळ्यांचाच होईल असं म्हणत आमदार जयंत पाटलांचा कोणाला इशारा?

Pune Weather Update : पुणे गारठले! पारा थेट ९.८ अंश सेल्सिअसवर, थंडीने हुडहुडी वाढवली; पण 'या' दिवसांपासून पुन्हा वाढणार

Latest Marathi News Live Update : नगरपंचायत आणि नगरपरिषदा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस

संतापजनक घटना ! 'मंगळवेढ्यात बहिणींसमोर अश्लील कृत्य'; चौघांविरुद्ध गुन्‍हा, दाेघीजण घराच्या मागे गेल्या अन्..

SCROLL FOR NEXT