Dagdusheth Ganpati Trust sakal
पुणे

Dagdusheth Ganpati Trust : दगडूशेठ गणपती ट्रस्ट उभारणार राम मंदिराची प्रतिकृती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टतर्फे १३१ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टतर्फे १३१ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.

सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात देखाव्याच्या निर्मितीचा सोहळा व पूजन कलादिग्दर्शक अमन विधाते यांच्या हस्ते झाले.

पुढील वर्षी अयोध्येतील श्रीराम मंदिराची उभारणी पूर्ण होत आहे. यापार्श्वभूमीवर ट्रस्टतर्फे यंदा राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येत असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी बुधवारी (ता. २१) पत्रकार परिषदेत दिली.

ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ.रामचंद्र परांजपे, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, विश्वस्त विजयकुमार वांबुरे, उत्तम गावडे आणि मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण उपस्थित होते.

मुख्य सभागृहात सोनेरी रंगाच्या छटांमध्ये गणरायाचे मखर असून सभोवती सुशोभित कमानी आहेत. मंदिर परिसर व मार्गामध्ये रामायणातील घटनांचा आढावा चित्र व लेखन स्वरूपात मांडण्यात येणार आहे.

बेलबाग चौकातून प्रवेश करताना काल्पनिक रामसेतू उभारण्यात येणार आहे. तेथून भाविकांना मंदिरात प्रवेश करता येईल. श्रीराम, हनुमंत आणि वानरसेनेच्या वानरांच्या प्रतिकृती देखील असणार आहेत, अशी माहिती सूर्यवंशी यांनी दिली.

१०० कामगार आणि ७५ दिवस :

सजावट विभागात १०० कारागीर दिवस-रात्र सलग ७५ दिवस कार्यरत राहणार आहेत. मंदिराची प्रतिकृती फायबरमध्ये उभारण्यात येणार असून त्यावर रंगकाम करण्यात येईल.

मुख्य सभामंडपातील खांबांची रचना आणखी सुटसुटीत करण्यात येत असून यामुळे भाविकांना लांबून देखील सहजपणे गणपतीचे दर्शन घेणे शक्य होणार आहे, अशी माहिती कलादिग्दर्शक विधाते यांनी दिली.

अशी असणार प्रतिकृती :

- आकार १२५ फूट लांब, ५० फूट रुंद आणि १०० फूट उंची

- लाकूड, बॉटम, प्लायवूड आदी साहित्याचा वापर

- सजावटीच्या शेवटच्या टप्प्यात दिवे बसविणार

- प्रतिकृतीमध्ये २४ खांब व २४ कमानी असणार

- मंदिराचा मुख्य घुमट १०० फुटांपेक्षा उंच

- ध्वजासहित मंदिर १०८ फूट उंच असेल.

- छोटे आणि मोठे असे रेखीव ११ कळस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेश मूर्ती घडवण्याचं काम जोमात

SCROLL FOR NEXT