पुणे

जखमी गोविंदांचा आकडा ३७६ वर

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मुंबईत दहीहंडीचे थर रचताना ३७६ गोविंदा जखमी झाले आहेत. यापैकी ५३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ३७ जणांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार सुरू आहेत. २८६ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सरकारी आणि मुंबई महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये जखमी गोविंदांवर उपचार सुरू आहेत. मुंबई शहरातील रुग्णालयांमध्ये सर्वाधिक १८३ जखमी गोविंदा उपचारासाठी आले आहेत. त्यापैकी २९ जणांना दाखल करण्यात आले असून, २३ जणांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार सुरू आहेत आणि १३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पूर्व उपनगरातील रुग्णालयांत ६२ जखमी गोविंदा उपचारासाठी आले असून, त्यापैकी ११ जणांना दाखल करण्यात आले. ५१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. पश्चिम उपनगरातील रुग्णालयांमध्ये १२६ जखमी गोविंदा उपचारासाठी आले असून, त्यापैकी नऊ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १४ जणांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार सुरू आहेत, तर १०३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांनी रुग्णालयांना भेट देत जखमी गोविंदांची विचारपूस केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : पुण्यात उद्या MPSC विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चा

Ram Mandir Trust: राम मंदिर ट्रस्टचे महासचिव स्वामी गोविंद देवगिरीजींचा महाराष्ट्र दौरा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन सुरू

SCROLL FOR NEXT