crime 
पुणे

पुणे: दहिहंडीची वर्गणी न दिल्याने मित्रांनीच पेटविली दुचाकी

अश्‍विनी जाधव केदारी

पुणे : दहिहंडीच्या सणापूर्वीच पुण्यात दहिहंडीला गालबोट लागले आहे. दोन दिवसांपुर्वी दहिहंडीच्या बॅनर लावण्याच्या वादातून अक्षय घडसी या तरुणांचा शस्त्राने वार करुन खून करण्यात आला होता आता शनिवारी दहिहंडीची वर्गणी न दिल्याने चार जणांनी मित्राच्या दुचाकीवर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सर्व तरुणवर्गाचा आवडीचा सण म्हणजे दहिहंडी, दहिहंडीच्या कित्येक दिवस आधी तरुण वर्गाची लगबग पाहायला मिळते. कुठे वर्गणी गोळा करणे, तर कुठे दहीहंडीचे बॅनर, पोस्टर्स लावले जातात. आनंद उत्साहाच्या या सणावर पुण्यात मात्र विर्जन पडल आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात अक्षय घडसी या तरुणाचा परीसरात राहणाऱ्या पाच-सहा तरुणांनी धारदार शस्त्राने वार करून खून केला होता. खुनाच्या या घटनेला एक दिवस उलटत नाही तोवर पुण्यातील आंबेगाव येथे दहीहंडीची वर्गणी न दिल्यामुळे एका सोसायटीमध्ये मित्राच्याच दुचाकीला आग लावण्यात आल्याची घटना घडली आहे.  

वर्गणी न दिल्याचा राग मनात धरुन चार जणांनी दुचाकीवर पेट्रोल टाकून पेटवून दिली. याप्रकरणी प्रफुल्ल थोरात याने तक्रार दाखल केली आहे. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दत्ता शिंदे, ओंकार संदीप कांबळे, दत्ता राहुल कदम आणि सुमित राजू अहिवले यांना अटक केली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश उमरे यांनी दिली. केवळ वर्गणी देण्याला विरोध केल्याने मित्रांनीच 1 लाख 10 हजार किंमतीची गाडी पेटवून दिली आहे. एका ताटात जेवणाऱ्या मित्रानेच असे कृत्य केल्याने वाईट वाटत असल्याची प्रतिक्रिया प्रफुल्ल थोरातने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : चार सामने अन् Orange Cap साठी ७ दावेदार! विराटचा शेवटचा क्रमांक, Vaibhav Sooryavanshi पण आहे पुढे, टॉपर कोण?

डोळ्यात संताप अन् लेकरासाठीची तगमग; प्रार्थना बेहेरेच्या 'मर्दिनी'चा टीझर प्रदर्शित; दिसणार अभिनेत्रीचा दमदार अंदाज

कला, नृत्य आणि विज्ञानाचा संगम... मुंबईत ओपन सायन्स पार्क साकारतंय! विज्ञान शिकणं होणार आणखी रंजक

Mhada Lottery: काही दिवस बाकी! म्हाडाच्या २,६४० घरांची लॉटरी, लगेचच करा अर्ज; कुठे आणि कसा? जाणून घ्या...

Nautapa 2026: नवतापा म्हणजे काय? वर्षातील सर्वात गरम दिवसांमागचं धार्मिक आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT