वास्तववेध
प्रभाग क्रमांक दोन
गुंठेवारी, शैक्षणिक सुविधा, अभ्यास केंद्रासह पायाभूत सुविधा देण्यावर भर
तीन नगरसेवकांनी मांडला पाच वर्षांचा प्रभाग विकासचा प्लॅन
सकाळ वृतसेवा
सोलापूर, ता. १ : गेल्या पाच वर्षांत रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज आणि निवारा या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करत दहिटणे–शेळगी परिसरात विकासाची गती वाढली आहे. गुंठेवारी, शैक्षणिक सुविधा, अभ्यास केंद्र पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पुढील पाच वर्षाचा कार्यकाळ महत्त्वाचा असणार आहे, अशी भावना नगरसेवक किरण देशमुख, प्राध्यापक नारायण बनसोडे आणि कल्पना कारभारी यांनी व्यक्त केली आहे.
प्रभाग दोन मध्ये गेल्या पाच वर्षांत दहिटणे आणि शेळगी परिसरात मूलभूत सुविधांचा व्यापक विकास साधत तब्बल ८० कोटी रुपयांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. शेळगी–दहिटणे जोडणारा मुख्य रस्ता, दहिटणे व शेळगीतून रेल्वे यार्डाला जोडणारा प्रमुख मार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यात आले आहे. नगरोत्थान योजना आणि आमदार निधीतून ड्रेनेजलाईन, जलवाहिनी यांसारख्या अत्यावश्यक सुविधांवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आल्याने परिसराचे चित्र पालटले आहे.
कामगार वर्गासाठी अत्यल्प दरात निवारा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकारातून दहिटणे येथे पाच हजार घरकुलांचा ‘अटल गृहनिर्माण प्रकल्प’ उभारण्यात येत आहे. आतापर्यंत १ हजार २५० कुटुंबांना घरांचे वाटप करण्यात आले आहे. प्रभागातील ७० टक्के भागात उघड्या गटारी बंदिस्त करून स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे.
आरोग्य सुविधांच्या दृष्टीने शेळगीत एक कोटी रुपयांचा खर्च करून आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे.
---
SLC26B28311
या परिसरात कामगार वर्ग मोठा आहे. पाच वर्षांमध्ये ८० कोटी रुपये खर्चून मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात आले. त्याचबरोबर पाच हजार कामगारांसाठीची राज्यातील पहिली आवास योजना राबवण्यात आली. पहिल्या टप्प्यात बाराशे जणांना घरीही देण्यात आली आहेत. दहा कोटी रुपये खर्चून आरोग्य केंद्र उभारण्यात आले. येत्या पाच वर्षांमध्ये येथील गुंठेवारीचा प्रश्न मार्गी लावणे आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. रोजगार निर्मितीसाठी पापड उद्योग सुरू करण्यात आले. ते आणखी विस्तारित होण्यासाठी प्रयत्न असेल.
- डॉ. किरण देशमुख, नगसेवक
------
SLC26B28309
गतवेळी आलेल्या महापुरात व पावसाळ्यात या प्रभागातील सर्वाधिक भाग बाधित झाला. आता शेळगी नाला रुंदीकरण खोलीकरण करून त्याचे बांधकाम करणे अपेक्षित आहे. त्यासाठीचा निधी उपलब्ध असून तेही काम लवकर सुरू होणार आहे. या परिसरातील नागरिकांना शैक्षणिक सुविधांची नितांत गरज आहे. शैक्षणिक केंद्र, संस्कार वर्ग, महिला व युवतीच्या हाताला रोजगार मिळून देण्यासाठी छोट्या मोठ्या उद्योग सुरू करण्याचे मानस आहे.
- कल्पना कारभारी, नगरसेविका
----
SLC26B28310
आमच्या प्रभागांमध्ये मूलभूत सुविधांचे काम चांगल्या पद्धतीने झालेले आहे. आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आता स्पर्धा परीक्षांसाठीचे उत्तम ग्रंथालय उभारणे आणि महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा उद्योग केंद्र व महापालिकेचे महिला बालकल्याण केंद्र यांच्या माध्यमातून महिलांना उद्योग प्रशिक्षण देणे. तसेच बागांचे सुशोभीकरण करण्याचा मानस आहे.
- प्रा. नारायण बनसोडे, नगरसेवक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.