दहिवडीमध्ये
तीन अर्ज दाखल
दहिवडी, ता. २७ : दहिवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत तीन अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारी दुपारी दोन वाजेपर्यंत मुदत होती. या मुदतीत वर्षाराणी विलास सावंत, महेश पतंगराव जाधव व सुरेंद्र गणपती मोरे या तीन नगरसेवकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर झालेल्या छाननीत हे तीनही अर्ज वैध ठरले आहेत. गुरुवार पाच मार्च २०२६ रोजी दुपारी चार वाजेपर्यंत मुख्याधिकारी, दहिवडी नगरपंचायत यांच्याकडे लेखी सूचना देऊन अर्ज मागे घेता येईल. शुक्रवार सहा मार्च २०२६ दुपारी १२ वाजता आवश्यकता असल्यास निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येईल व त्यानंतर निकाल घोषित करण्यात येईल. अर्ज माघारी घेण्याच्या मुदती दरम्यान काय घडामोडी घडतात हे पाहावे लागणार आहे. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यात लक्ष घालून निवडणूक बिनविरोध करणार? निवडणूक तिरंगी होणार की दुरंगी याची उत्सुकता लागली आहे.
---------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.