पुणे

जिल्हास्तरीय शाहिरी पोवाडा स्पर्धेत दहिवडीची जबरदस्त कामगिरी

CD

शाहिरी पोवाडा स्पर्धेत दहिवडीची बाजी

लहान गटात सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद; मोठ्या गटात तृतीय क्रमांक

दहिवडी, ता. ५ : जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा २०२५- २६ अंतर्गत घेतलेल्या शाहिरी पोवाडा स्पर्धेत येथील विद्यार्थ्यांनी भरीव कामगिरी केली. लहान गटात सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावले, तर मोठ्या गटात पहिल्याच प्रयत्नात तृतीय क्रमांक मिळविला.
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाहिरी पोवाडा स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिवडी नंबर १ व ३ यांनी प्रथम क्रमांक मिळवून सातत्यपूर्ण गुणवत्तेची मोहोर उमटवली. लहान गटात मुख्य शाहीर म्हणून अर्णव जाधव याने प्रभावी सादरीकरण केले. त्याला मोहसीन शेख, सिद्धी क्षीरसागर, सिद्धार्थ मिराशी, वेदांत गायकवाड, स्वराली साठे, संस्कृती मतकर व स्वरा हिंगळकर यांनी उत्कृष्ट साथ दिली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिवडी नंबर १ च्या विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात तृतीय क्रमांक पटकावत भरीव यश मिळवले. मोठ्या गटात मुख्य शाहीर म्हणून साहिल दडस याने दमदार सादरीकरण केले. त्याला सोहम भोसले, पार्थ सकट, रुद्र पवार, राजवीर वायदंडे, विश्वभूषण वाघमारे, स्वराज जाधव व यश शिंदे यांनी साथ दिली. १९ फेब्रुवारीला किल्ले प्रतापगड येथे होणाऱ्या शासकीय शिवजयंती कार्यक्रमात ही पोवाड्याचे सादरीकरण आणि बक्षीस वितरण कार्यक्रम होणार आहे.
या यशासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिवडी नंबर १ चे मुख्याध्यापक विजय खरात, तसेच दहिवडी नंबर ३ चे मुख्याध्यापक महादेव महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली केशर माने, सुनीता यादव, मनीषा बोराटे, राजेंद्र खरात, सागर जाधव, रेखा मोहिते, नम्रता चव्हाण, माया तंतरपाळे, आशा जाधव आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
या यशाबद्दल गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, शिक्षण विस्तार अधिकारी शमीम तांबोळी व विजय गंबरे, केंद्रप्रमुख शोभा पवार, तसेच शाळा व्यवस्थापन समिती दहिवडी नंबर १ व ३, सर्व शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

..........


B07141
सातारा : जिल्हास्तरीय शाहिरी पोवाडा स्पर्धेतील जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी, शिक्षक व मान्यवर. (रूपेश कदम : सकाळ छायाचित्रसेवा)

.....................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India China Trade : सहा वर्षांपासून बंद कुलूप अखेर उघडणार! भारत-चीन संबंधांना नवं वळण, गलवाननंतर पहिली मोठी हालचाल!

हमजा नाहीतर DHURANDHAR 2 चा खरा किंग आहे 'हा' अभिनेता, त्याने दाऊदला सुद्धा सोडलं नाही, 45 वर्ष केलं पाकिस्तानात राज

Rare Wildlife Ratnagiri : निसर्गप्रेमींसाठी मोठी बातमी! सह्याद्रीच्या पायथ्याशी पहिल्यांदाच दिसला राज्यप्राणी 'शेकरू'; जोडीदाराचाही शोध सुरू

Sangamner Acid Attack: संशयित आरोपीचे रेखाचित्र जारी; संगमनेर अ‍ॅसिड हल्ला प्रकरण, तपासासाठी दहा पथके तैनात!

Hingoli News: अवेळी पावसाने गहू काढणीला तडाखा; हार्वेस्टर अभावाने शेतकरी चिंतेत

SCROLL FOR NEXT