पुणे

शिवनेरी रस्त्यावर रोजच अतिक्रमण कारवाई; चार टन जप्त मालाचा लिलाव

प्रविण डोके

पुणे : सातारा रस्त्यावरून मार्केट यार्डात जाणाऱ्या शिवनेरी रस्त्यावर दोन्ही बाजूंना फळे, भाजीपाला, हातगाडीवाले, टपर्‍या, विक्रेत्यांनी मोठया प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. रस्त्यावरून ये-जा करणार्‍या वाहनांना याचा अडथळा होऊन वाहतूक कोंडीत होत आहे. त्यामुळे या रस्त्यावर बुधवारी बाजार समिती प्रशासनाने अतिक्रमण कारवाई करत हा रस्ता रिकामा केला. यामध्ये जवळपास चार टन शेतमाल जप्त करत त्याचा लिलाव समितीकडून करण्यात आला. तसेच या रस्त्यावर रोजच अतिक्रमण कारवाई केली जाणार आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा सुरक्षा रक्षक विभाग, पदाधिकारी, कर्मचारी, वाहतूक पोलिस व महापालिकेचा अतिक्रमण विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत विक्रेत्यांकडून विक्री सुरू असलेला साधारणतः चार टन माल आणि विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेला मालाचा लिलाव करण्यात आला. शिवनेरी रस्ता कायमचाच अतिक्रमणमुक्त करण्यासाठी रोजच कारवाई केली जाणार असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.

शिवनेरी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे कायमच हा रस्ता वाहतूक कोंडीत असतो. वाहतूक कोंडीला अतिक्रमण हेच मुख्य कारण असल्याने शिवनेरी रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्धार बाजार समिती प्रशासनाने केला आहे. मार्केट यार्डातील विविध विभागात माल घेऊन येणारी वाहने शिवनेरी रस्त्याने येतात आणि जातात. परिसरात वास्तव्याला असणारे नागरिकांची वाहने तसेच शहरातून खरेदीला येणारी वाहनेही याच रस्त्याने ये-जा करतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहनाचा ताण आहे.

वीस सुरक्षा रक्षक तैनात

शिवनेरी रस्त्यावरील अतिक्रमण कायमचेच हटविण्यासाठी दोन्ही बाजूने विशिष्ट अंतरावर 20 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. हे सुरक्षारक्षक तात्काळ पथारीवाल्यावर कारवाई करून माल जप्त करतील. जप्त मालाचा लिलिाव करण्यात येईल. या रस्त्यावर आता रोजच कारवाई केली जाणार आहे.

- मधुकांत गरड, प्रशासक, बाजार समिती, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case Update : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यावर मोठी कारवाई, प्रशासनात खळबळ !

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 मार्च 2026

Panchang 25 March 2026: आजच्या दिवशी नारायण कवच या स्तोत्राचे पठण आणि ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

राज्यरंग - पंजाब : राजकीय अस्थिरतेचा दुसरा अंक

मानसवेध : माझ्यात काहीतरी कमी आहे?

SCROLL FOR NEXT