पुणे

agn Milk Prices Surged 10092026_txt.txt

CD

दुधाच्या खरेदीदरात तेजी

सणासुदीमुळे मागणी; दुष्काळी स्थिती, चाराटंचाईचा परिणाम

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : राज्यातील दुष्काळी स्थिती तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांना सणासुदीच्या वाढत्या मागणीमुळे राज्यात शेतकऱ्यांकडील गाय दुधाच्या खरेदी दरात वाढ झाली आहे.
राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत एकूण सरासरीच्या ३० टक्के कमी पाऊस झालेला आहे. पावसाचा दीर्घ खंड राहिल्यामुळे दुभत्या जनावरांच्या चाऱ्याची टंचाई काही भागात तयार झाली आहे. चारा महागला असून, त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्चही महागला आहे. दुसऱ्या बाजूला दूध उत्पादनात आघाडीवर असलेल्या दक्षिणेतील कर्नाटक, तमिळनाडू तसेच उत्तरेतील गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात कमी पाऊस आहे. त्यामुळे देशभरातून दुधाचा पुरवठा मर्यादित होत असून त्याचा परिणाम दुधाचे खरेदी दर तेजीत ठेवण्यावर होतो आहे.
‘सोनाई’चे डेअरीचे संचालक दशरथ माने म्हणाले, ‘‘श्रावणात डेअरी उत्पादनाच्या बाजारपेठांमध्ये वाढलेली मागणी, पुढेही सणासुदीमुळे चांगली मागणी राहण्याचा अंदाज आणि मिठाईसह तूप व लोण्याच्या वाढत्या मागणीमुळे डेअरी क्षेत्राला दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दर देणे शक्य झालेले आहे. सध्या तेजीमुळे गाय दुधासाठी शेतकऱ्यांना प्रति लिटर ३८-३९ रुपयांवरून ४१ रुपयांपर्यंत खरेदी दर मिळतो आहे. मात्र राज्य व राज्याबाहेरील दुष्काळाची वाटचाल पुढे कशी राहते यावर दूध दरातील तेजी निश्चित होत राहील.’’
दरम्यान, पुणे जिल्हा सहकारी (कात्रज) दूध संघाकडून दूध खरेदी दरात प्रति लिटर १ रुपयाची वाढ करण्यात आली आहे. कात्रजचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी सांगितले, की दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी, दुग्ध व्यवसायातील वाढता उत्पादन खर्च तसेच शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी खरेदी दर वाढविल्यामुळे शेतकऱ्यांच्या सहकारी दूध सोसायट्यांना आता वरकड खर्चासह जादा रक्कम मिळेल. आता गाय दुधाला (३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी) प्रति लिटर ४०.८० रुपये प्रति लिटर दर मिळेल. तर म्हैस दुधाकरिता ६ फॅट व ९ एसएनएफसाठी) ५४ रुपये दिले जाणार आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच भेसळमुक्त व उच्च दर्जाच्या दुधाचा पुरवठा वाढावा यासाठी ही दरवाढ आहे. मात्र विक्रीदरात वाढ करून ग्राहकांवर बोजा टाकण्यात आलेला नाही.

चौकट ----
ॲनालॉग पनीरवर बंदी फायदेशीर ठरली
दुधाऐवजी तेलापासून तयार होत असलेल्या ॲनालॉग पनीरवर बंदी घातली जात आहे. त्याचा फायदा दुधापासून तयार होत असलेल्या अस्सल पनीरच्या बाजारपेठेला होतो आहे. सध्या महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि कर्नाटकने कृत्रिम किंवा ॲनालॉग पनीरच्या उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर बंदी घातली आहे. राज्यात आता दुधाच्या पनीरचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्याने दूध मागणीत आपोआप वाढ झाली. त्यामुळे ॲनालॉग पनीरवरील बंदी शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडल्याचे डेअरी उद्योगाचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : माहिती अधिकाराचा बोजवारा, तीस दिवसांत मिळणे अपेक्षित असलेल्या माहितीसाठी साडेतीन वर्षांचा विलंब; स्वाक्षरीसाठीही तब्बल ११ महिने

SCROLL FOR NEXT