पुणे

कऱ्हाड दलीत महासंघाचे सत्यशोधा आंदोलन

CD

दलित महासंघाचे सत्य शोधा आंदोलन

कऱ्हाडमध्ये प्रारंभ; नागरिकांची भेट, पाठिंबा

कऱ्हाड, ता. ९ ः येथील तहसील कार्यालय, प्रादेशिक परिवहन अधिकारी, शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर अनेकदा आंदोलन होतात. त्या आंदोलनामागचा हेतू काय? त्यासाठी दलित महासंघातर्फे आजपासून सत्य शोधा आंदोलनास सुरुवात झाली. या आंदोलनास प्रतिसाद मिळत आहे. दलित महासंघाचे प्रकाश वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असून, दिवसभरात आंदोलनस्थळी विविध नागरिकांनी भेट देऊन पाठिंबा दिला.

श्री. वायदंडे म्हणाले, ‘‘न्याय, समाजहितासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिला आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांपैकी हाताचे बोटावर मोजण्याइतके अवैध धंद्याविरोधातील कारवाईसाठी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसतात. असे काही लोक वगळता काहीजण आंदोलनास बसल्यावर पोलिस, उत्पादन शुल्क विभाग आणि संबंधित व्यवसायचालकांसोबत खासगीत अर्थपूर्ण तडजोडी करून आंदोलन मागे घेऊन व्यक्तिगत स्वार्थ साधतात. त्यामुळे संबंधित यंत्रणा किंवा शासन सामाजिक चळवळीतील सर्वच कार्यकर्त्यांकडे साशंकतेने बघते. त्यामुळे एखाद्या प्रश्नास न्यायाच्या भूमिकेने कार्यकर्ता गेल्यास प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. म्हणून अवैध धंद्यात कारवाई, गौण खनिज, निवडणूक शाखा, पुरवठा विभागाशी निगडित प्रश्न, वाहतूक शाखेतील प्रश्नासह परिवहन विभागातील मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्यांची भूमिका आणि हेतू तपासण्यात यावा. आंदोलनाच्या हेतूबरोबरच सामाजिक असल्यास त्यास न्याय मिळावा. त्यांच्या हेतूबद्दल साशंकता जाणवेल किंवा संभ्रम निर्माण होत असल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, अशा आंदोलनामागील गौडबंगाल काय? त्याचे सत्य शोधा आंदोलन दलित महासंघातर्फे सुरू आहे. ते शोधण्याची मागणी दलित महासंघातर्फे करण्यात येत आहे.


W41180
कऱ्हाड ः दलित महासंघातर्फे तहसीलदार कार्यालयाबाहेर सत्य शोधा आंदोलनास प्रारंभ झाला. त्यात सहभागी कार्यकर्ते.
....................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SLC XI Warm up: टीम इंडियाने सहज जिंकला सराव सामना! आता सुरू होणार खरी परीक्षा, पाहा कसोटी मालिकेचे वेळापत्रक

Buldhana Accident: खदाणीच्या पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मेहकर तालुक्यातील कोराडी प्रकल्पाजवळील घटना

फोटो काढायला आली अन् Kiss करून गेली! चाहतीचं भयंकर कृत्य पाहून घाबरली अभिनेत्री, Viral Video

Bhokardan Accident: भोकरदन-वालसावंगी मार्गावरील धोकादायक विहिरी ठरताहेत मृत्यूचा सापळा; कार विहिरीत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

Ambad Accident: खंडोबाची वारी मागण्यासाठी आले अन् काळाचा घाला; अंबडमध्ये टेम्पोच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT