kadus lake
kadus lake 
पुणे

शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे, खेडमधील बंधारा अद्याप रिकामा  

महेंद्र शिंदे

कडूस (पुणे) : खेड तालुक्यातील कडूस आणि परिसरातील पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा एकमेव आधार असलेला कुमंडला नदीवरील बंधारा अजूनही भरला नाही. दरवर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीला सांडव्यावरून ओसंडून वाहणारा बंधारा यंदा मात्र ऑगस्ट महिना उजाडला तरी अर्ध्यापेक्षा जास्त रिकामा आहे. आगामी काळातील पाणी टंचाईच्या शक्‍यतेने ग्रामस्थ व शेतकरी धास्तावले आहेत. 

कडूस येथे कुमंडला नदीवर 2.25 दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमतेचा बंधारा आहे. हा बंधारा कडूससह परिसरातील गावे व वाड्यावस्त्यांच्या पाण्याचा एकमेव आधार आहे. या बंधाऱ्यातील पाण्यावर ग्रामस्थांना व परिसरातील शेतीला बाराही महिने अवलंबून राहावे लागते. दरवर्षीच्या पावसाळ्यात हा बंधारा जुलै महिन्याच्या सुरवातीला पाण्याने पूर्ण क्षमतेने भरतो. यंदा मात्र ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा गेला, तरी बंधाऱ्यात पंचवीस टक्के सुद्धा पाणी साठा झाला नाही. 


चक्रीवादळानंतर तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यात मोठा व दमदार पाऊस झाला नाही. यामुळे कुमंडलेला पूर सुद्धा वाहिला नाही. कुमंडला प्रवाही झाली असली, तरी पाण्याचा प्रवाह मोठा नाही. संथगतीने पाणी वाहत आहे. त्यामुळे या नदीवरील कडूस येथील बंधाऱ्यात पाणी साठू शकले नाही. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
पाण्याचा एकमेव स्रोत बळकट न झाल्याने पाणी टंचाईची शक्‍यता ग्रामस्थांना भेडसावत आहे. बंधारा पूर्ण क्षमतेने पाण्याने भरण्याची प्रतीक्षा ग्रामस्थ करीत आहे. बंधारा भरण्यासाठी दमदार पावसाची आवश्‍यकता आहे. पावसासाठी अनुकूल वातावरण होऊनही पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT