‘दामाजी’तर्फे सभासदांसाठी
दिवाळीनिमित्त साखर वाटप
उद्यापासून २९ केंद्रांवर होणार वितरण
सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. २ : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दिवाळीनिमित्त सभासदांना सवलतीच्या दरात साखर वाटप करण्यात येणार आहे. येत्या ४ ते ७ नोव्हेंबरदरम्यान प्रतिकिलो ३० रुपये दराने २५ किलो साखर सभासदांना दिली जाणार आहे. यासाठी तालुक्यात २९ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत साखर घेण्याचे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी केले आहे.
साखर वाटपासाठी कारखाना साइट - उचेठाण, मंगळवेढा नागणेवाडी कार्यालय, खोमनाळ नाका, ब्रह्मपुरी, माचणूर, बोराळे, सिद्धापूर, अरळी, डोणज, नंदूर, मरवडे, तळसंगी, हुलजंती, सोड्डी- येळगी चौक, सलगर बुद्रूक, मारोळी, लोणार, हुन्नूर, भोसे, रड्डे, निंबोणी, नंदेश्वर, पाटखळ, शिरसी, लेंडेचिंचाळे, आंधळगाव, लक्ष्मी दहिवडी, मारापूर आणि मल्लेवाडी या २९ केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांवर संबंधित गावांतील सभासदांना साखर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सभासदांनी साखर घेण्यापूर्वी विक्री केंद्रावर आपल्या साखर कार्डची नोंदणी करून घ्यावी. निर्धारित कालावधीत साखर न उचललेल्या सभासदांसाठी कारखाना साइटवर दर शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत डिसेंबरअखेरपर्यंत साखर देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती प्रभारी कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.