Ambegaon rain 
पुणे

पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास

सुदाम बिडकर

पारगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये काल (ता. 3) सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष करुन पावसाळी बाजरीचे मोठे नुकसान झाले आहे.

या परिसरात काल सकाळपासून वातावरणात उकाडा जाणवत होता. सायंकाळी पाच वाजता काळे ढग दाटुन आले. सायंकाळी साडपाच वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तास पाऊस पडत होता. अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, जारकरवाडी, पारगाव, काठापुर बुद्रुक, लाखणगाव, देवगाव, पोंदेवाडी, खडकवाडी, वाळुंजनगर, धामणी, लोणी, वडगावपीर, शिरदाळे, पहाडदरा आदी गावात जोरदार पाऊस पडला. ओढे नाल्यांना पूर आला होता. शेतातील बाजरी, कडवाळ, टोमॅटो व तरकारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतात पाण्याची तळी साचली आहेत. काढणीला आलेली बाजरीची पिके भुईसपाट झाली, तर शेतात काढणी केलेली बाजरीची कणसे भिजल्याने मोठे नुकसान झाले .

या नुकसानींचे पंचनामे करुन त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पोंदेवाडीचे माजी सरपंच आनिल वाळुंज यांनी केली आहे. या हंगामातील सर्वात जोरदार पाऊस काल झाला. जारकरवाडी परिसरात विजेच्या खांबावरील तारा तुटल्याने अनेक ठिकाणचा विजपुरवठा खंडीत झाला ,असे भीमाशंकर साखर कारखान्याचे माजी संचालक विलास लबडे यांनी सांगितले. काल पडलेल्या पाऊस रब्बी हंगामातील गहु, हरभरा, ज्वारी पिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे, असे पोंदेवाडीचे माजी सरपंच बबनराव वाळुंज यांनी सांगितले.  

वाहनचालकांचे हाल
या पावसाने सखल भागातील रस्त्यांवर सुमारे चार ते पाच फुट पाणी साचले. त्यामुळे वाहनचालकांची मोठ्या प्रमाणावर त्रेधातिरपीट उडाली. मंचर- पारगाव रस्त्यावरील अवसरी बुद्रुक येथील विजय ढाबा व शर्वरी ॲटो गॅरेजच्या समोर पावसाच्या पाण्याने सखल भाग आहे. येथे तीन ते साडेतीन फूट पाणी साचले होते. त्यामुळे येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या पाण्यात मार्ग काढताना एका वाहनचालकाला अंदाज आला नाही. त्यामुळे त्याचे वाहन रस्त्याच्या शेजारी असलेल्या खड्ड्यात जाऊन अडकले. त्यातून वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुरज हिंगे, राहुल हिंगे, शशी हिंगे यांच्या मदतीने वाहनांना रस्ता मोकळा करून देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election साठी भाजप-शिवसेना एकत्र, पण राष्ट्रवादीचा उल्लेख नाही, जागावाटपाचा फॉर्म्युलाच सांगितला!

Dhurandhar Craze in Pakistan: पाकिस्तानात ‘धुरंधर’ पाहण्याची क्रेझ! बंदी असतानाही लोक कसे पाहतायत चित्रपट?

Kolhapur Property Survey : करवीर तालुक्यात ऐतिहासिक सर्वेक्षण; १३२ गावांतील ४० हजार मिळकतींना युनिक ओळख

Agriculture News : नाशिकमध्ये रब्बी पीकविम्याला थंडा प्रतिसाद! ४ लाख शेतकरी विम्यापासून दूर; काय आहे कारण?

Latest Marathi News Live Update : वर्धेच्या देवळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा

SCROLL FOR NEXT