पुणे

पुणे : अंजीर बागांचे नुकसान पण पंचनामे कोणी करेना...

महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर : वादळ आणि पावसाने नुकसान झालेल्या गोगलवाडी (ता.हवेली) येथील अंजीर बागांचे ताबडतोब पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिले होते. प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या या आदेशाकडे दुर्लक्ष केले असून, आठवड्यानंतरही पंचनामे करण्यात आलेले नाहीत. तर दुसरीकडे पंचनामे कोणी करायचे याबाबत कृषी आणि महसूल विभागातच ताळमेळ नाही. 

गेल्या आठवड्यापूर्वी झालेल्या वादळ आणि पावसाने गोगलवाडी (ता.हवेली) येथील अंजीर बागांचे नुकसान झाले होते. या नुकसानीची पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर यांनी भेट देऊन पाहणी केली होती. तसेच नुकसान झालेल्या अंजीर बागांचे ताबडतोब पंचनामे करण्याचे आदेश प्रशासकीय कर्मचाऱ्यांना दिले होते. मात्र, एक आठवडा उलटून गेल्यानंतरही येथील नुकसान झालेल्या अंजीर बागांचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आदेशाकडे येथील प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी पूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गोगलवाडीचे सरपंच अशोक गोगावले म्हणाले, "नुकसान झालेल्या अंजीर बागांचे जिल्हा परिषद अध्यक्षांनी ताबडतोब पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. मात्र एक आठवडा झाला तरी अजूनही पंचनामे करण्यासाठी कोणी फिरकले नाही."

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

तर महसूल विभाग आणि कृषी विभागाशी संपर्क साधला असता हे पंचनामे झाले आहेत किंवा कोण करणार, कधी करणार याबाबत त्यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Agarkar च्या जागी कोण? रोहित शर्माशी पंगा महागात पडला, BCCI ने शॉर्टलिस्ट केली दोन नावं, दोघांचेही मुंबई इंडियन्सशी कनेक्शन

Gold Jewellery: सोन्याचे दागिने महागणार? हॉलमार्किंग शुल्कात तब्बल 67% वाढ; बिल किती वाढणार?

Pune-Bengaluru Highway Update : कराड उड्डाणपुलाचे काम पूर्ण, पण पुलाखालील 'अतिक्रमणांचे ग्रहण' सुटणार कधी? महामार्ग विभागासमोर मोठे आव्हान

सव्वा पायलीचा भात, नऊ भाज्या आणि... माहेरवाशीण नाही बांदेकरांकडे सुना बसवतात गौरी, पूजा बिरारी म्हणते-

Latest Marathi News Update : अकोल्यात अवैध जुगार अड्ड्यावर खदान पोलिसांची धाड; २७.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT