damini marshall saves four days newly born baby pune marathi news hadapsar sakal
पुणे

Pune News : दामिनी मार्शलांनी दिले चार दिवसाच्या नवजात बालिकेला जीवदान

दामिनी मार्शलांच्या प्रसंगावधानामुळे चार दिवसाच्या बेवारस जखमी बालिकेला जीवदान देण्यात यश

कृष्णकांत कोबल

हडपसर : सतर्क नागरिक व दामिनी मार्शलांच्या प्रसंगावधानामुळे चार दिवसाच्या बेवारस जखमी बालिकेला जीवदान देण्यात यश आले आहे. ससानेनगर येथील गल्ली नंबर १३ च्या परिसरात मंगळवारी (ता. ३१) साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

हडपसर पोलिसठाण्यातील दामिनी मार्शल व तुकाईदर्शन पोलिस चौकीच्या मार्शलांना ससाणेनगर गल्ली नंबर १३ येथे दामिनी मार्शलची आवश्यकता असल्याचे फोनद्वारे समजले. त्याठिकाणी मार्शल गेले असता तेथे चार दिवसाची नवजात बालिका बेवारस स्थितीत आढळून आली. अधिक तपास केला असता या बालिकेला कोणीतरी अज्ञात व्यक्ती सोडून गेले असल्याचे निष्पन्न झाले.

दामिनी मार्शल महिला पोलीस अंमलदार वैशाली उदमले, राजश्री जाधव, मंजुषा डेंगळे, उषा सोनकांबळे व तुकाईदर्शन पोलिसचौकी मार्शल श्री. पवार यांनी बालिकेला ताब्यात घेऊन तपासले असता या बालिकेच्या अंगावर मांजराच्या नख्यांचे व्रण दिसून आले होते. त्यामुळे ही मुलगी रडत होती.

त्यांनी तात्काळ या बालिकेला जवळच्या दवाखान्यात नेऊन प्राथमिक उपचार केले. दरम्यान या बाबतची माहिती स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व बाल कल्याण समितीस दिली. त्यानंतर या बालिकेला पुढील उपचारासाठी के. एम. रुग्णालयात पाठवण्यात आले.

पुढील देखभाल, काळजी व संरक्षणासाठी बालकल्याण समितीच्या आदेशाने मुलीला कोरेगाव पार्क येथील भारतीय समाजसेवा केंद्रात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मुलीच्या अज्ञात पालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्शलांनी केलेल्या या कामाचे परिसरात कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT