Murderer Attack esakal
पुणे

Pune Crime : दांडिया कार्यक्रमात टोळक्याकडून दहशत, तरुणावर कोयत्याने वार

जुन्या भांडणाच्या कारणावरून दांडिया कार्यक्रमात टोळक्याने दहशत माजवून तरुणावर कोयत्याने वार करून जखमी केले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - जुन्या भांडणाच्या कारणावरून दांडिया कार्यक्रमात टोळक्याने दहशत माजवून तरुणावर कोयत्याने वार करून जखमी केले. ही घटना कात्रजमधील संतोषनगर परिसरात घडली.

अर्जुन दिलीप मोरे (वय १९, रा. मोहिली, शहापूर, जि. ठाणे ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मोरे याने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अमित चोरगे, अक्षय सावंत, अभी सावंत, अजय रांजणे, प्रसाद रांजणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोरे त्याच्या मामाच्या मुलासह संतोषनगर परिसरात मंगळवारी (ता. ८) रात्री दांडिया कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी अमित चोरगे आणि त्याचे साथीदार तेथे आले. चोरगेचे यापूर्वी काहीजणांशी भांडण झाले होते. या वादातून आरोपींनी दांडिया कार्यक्रमात कोयते हवेत फिरवत दहशत माजवली. त्यांनी मोरे याच्या डोक्यात आणि पाठीवर कोयत्याने वार केले. त्यात मोरे गंभीर जखमी झाला. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

मुंढव्यात दांडियात आणखी एकावर वार -

दांडिया खेळताना झालेल्या वादातून एकावर कोयत्याने वार केल्याची घटना घोरपडीतील बी. टी. कवडे रस्ता परिसरात मंगळवारी घडली. आनंद देवेंद्र मांगले (वय ४५, रा. बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

या प्रकरणी मांगले यांची पत्नी शीतल (वय ४३) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून ईश्वर दांडेली, मारुती गवंडी, ऋषीकेश दांडेली, निखिल गवंडी, विशाल गवंडी, संतोष दांडेली, जावेद शेख, अनिकेत अनगल (सर्वजण रा. बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT