bhor 
पुणे

यांना वेळीच आवरा....गाड्या भरभरून पुणे- मुंबईकर भोर- वेल्ह्याकडे 

किरण भदे

नसरापूर (पुणे) : पुणे व मुंबई येथून बाहेरगावी जाण्यास नागरिकांना मुभा दिल्याने या शहरातून ग्रामीण भागातील आपापल्या गावात जाण्यासाठी नागरिकांची रीघ लागली आहे. त्यामुळे भोर व वेल्हे तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात नागरिक मिळेल त्या वाहनाने येत आहेत. मात्र, त्यांच्यामुळे कोरोना प्रसाराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. 

अवघडच आहे, दौंडमध्ये कोरोनाबाधिताच्या मुलाकडून चहाची विक्री... 

वेल्हे तालुक्‍याचे प्रवेशद्वार असलेल्या नसरापूर चेलाडी येथील तपासणी नाक्‍यावर शुक्रवारी (ता. 15) सकाळी सकाळीच दोन आरामबस भरून नागरिक वेल्हे तालुक्‍याकडे रवाना झाले आहेत; तर इतर रिक्षा, मोटार या वाहनांमधून देखिल नागरिक येत आहेत. तसेच, कापुरव्होळ येथील भोर फाटा तपासणी नाक्‍यावर भोरच्या वरील दुर्गम भागातील गावांमधील मुंबई येथे राहणाऱ्या नागरिकांच्या वाहनांची रांग लागली आहे. 

कोरोनामुक्त इंदापूरकर अशा पद्धतीने घेणार काळजी...  

विशेष म्हणजे या गाड्यांमधील बऱ्याच नागरिकांकडे मुंबई येथे तपासणी केलेला डॉक्‍टरांचा अहवाल व पोलिस परवानगी देखिल नाही. त्यामुळे कोरोना संसर्ग झालेली व्यक्ती देखिल गावाकडे येऊन ग्रामीण भागात संसर्ग वाढवू शकते, असा मोठा धोका निर्माण झाला आहे 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबत भोरचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी माहिती दिली की, या धोक्‍याची शक्‍यता पाहता आम्ही प्रशासनाच्या वतीने गावचे पोलिस पाटील, तलाठी, सरपंच, ग्रामसेवक यांचे एक कोरोना सुरक्षा दल स्थापन केले असून, गावामध्ये पुण्या- मुंबई येथून येणाऱ्या सर्व नागरिकांना गावात जाऊ न देता त्यांना गावाबाहेरील शाळा, समाज मंदिर, आदी ठिकाणी होम क्वारंटाइन करणार आहे. प्राथमिक लक्षणे असलेल्या व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण करून त्यांच्यावर सातत्याने आरोग्य विभागाचे लक्ष राहणार आहे. त्यासाठी गावामधील तरुण व ग्रामस्थांचे प्रशासनास सहकार्य अपेक्षित आहे. त्यांनी यासाठी पुढे यावे, असे आवाहन प्रांताधिकारी जाधव यांनी केले आहे. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सूनच्या परतीला सुरुवात ! राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Spinach Oats Tikki: हेल्दी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांत बनवा हेल्दी अन् कुरकुरीत पालक-ओट्सची टिक्की

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

SCROLL FOR NEXT