Danger of impact on root crops due to lack of rains in Mulshi 
पुणे

मुळशीतील शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा; भातरोपांना फटका बसण्याची शक्यता

सकाळवृत्तसेवा

पिरंगुट : मुळशी तालुक्यात पावसाने पाठ फिरविली असून भातरोपांना त्याचा मोठा फटका बसण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मुळशीतील शेतकरी मोठ्या व संततधार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. तालुक्यातील भात पेरणी उरकत आलेली आहे. बहुतांशी शेतकऱ्यांनी भाताच्या रोपांची पेरणी केली असून सुमारे ऐंशी टक्के शेतकऱ्यांची भात रोपे लागवडीसाठी योग्य झाली आहेत. मात्र, गेल्या आठवडाभर मुळशीत पाऊस झालाच नाही. त्यामुळे पावसाअभावी भात रोपे असलेली खाचरे रखरखीत झाली आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

तीव्र उन्हाचा चटका लागल्याने पाण्याचा टिपूसही शेतात राहिला नाही. त्यामुळे भातरोपे कोमेजून जाऊ लागली असून काही ठिकाणी पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे केवळ पाऊस न पडल्याने मुळशीतील भातरोपे पाण्याअभावी करपण्याचा धोका निर्माण झाला आहे. आठवडाभरात पाऊस झाला नाही तर कदाचित येथील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुळशीच्या पूर्व पट्ट्यातील ही परिस्थिती आता पश्चिम पट्ट्यातही निर्माण होऊ लागली आहे. मुठा खोरे, मोसे खोरे तसेच पिरंगुट, लवळे परिसरातील अनेक ठिकाणी भातरोपे पिवळी पडू लागली असून काही ठिकाणी सुकू लागली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे त्यांनी पंपाच्या साह्याने खाचरात पाणी आणून भात लागवड सुरू केली आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डावजे (ता.मुळशी) येथील शेतकरी विठोबा मानकर म्हणाले, "आमची भात रोपे लागवडीसाठी तयार झाली असली तरी पाण्याअभावी लागवड खोळंबली आहे. पंपाच्या साह्याने जरी खाचरात पाणी सोडले तरी ते केवळ दोनच दिवस टिकते. दोन दिवसानंतर पुन्हा खाचराला भेगा पडायला सुरवात होते. त्यामुळे भात लागवडीसाठी पावसाच्या पाण्याशिवाय पर्यायच नाही. येत्या दोन दिवसांत पाऊस झाला नाही तर सध्याची भात रोपे जळून जातील इतकी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दुबार पेरणीचा धोकाही निर्माण झाला आहे."  
पुण्याची पीएमपी व्हेंटिलेटरवर; करार रद्द करण्यासाठी कंत्राटदारांना नोटिस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: काव्या मारनच्या संघात ३००+ विकेट्स घेणारा खेळाडू दाखल; KKRनेही विदर्भच्या पोट्ट्यासाठी मोजले लाखो

ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा ठाणेकरांना दिलासा! १०० कोटींची देणी थकीत, अनेक महत्त्वाच्या गोष्टींची तरतूद; वाचा सविस्तर

Latest Marathi News Live Update : इगतपुरी तालुक्यात पुन्हा अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची घटना

प्रीपेड वीजबिल वसुलीची ‘सरकारी एन्ट्री’! वीजजोडण्या बदलण्यास ऊर्जा विभागाची मंजुरी

Kedarnath Yatra: केदारनाथ यात्रेकरूंना मोठे गिफ्ट! १३ वर्षांनंतर रामबाडा-गरुडचट्टी मार्ग 'रेडी'; आपत्तीच्या काळात ठरणार 'लाईफलाईन'!

SCROLL FOR NEXT