पुणे

धोकादायक गटारात पडल्‍याने वृध्‍दा जखमी

CD

धोकादायक गटारात पडल्‍याने वृद्धा जखमी

राधिका रस्‍त्‍यावरील घटना; नागरिकांच्‍या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली

सातारा, ता. ३ : येथील राधिका रस्‍त्‍यावरील कर्मवीर सोसायटीतील धोकादायक गटाराच्‍या तक्रारीकडे पालिकेने दुर्लक्ष केल्‍यामुळे त्‍यात पडल्‍याने आज एक वृद्धा जखमी झाली. नागरिकांच्‍या सतर्कमुळे खोल गटारात पडलेल्‍या वृद्धेची सुटका झाली.
कर्मवीर सोसायटीत एक गटार असून, ते खोल आहे. या गटाराचा काही भाग उघडा असून, त्‍यापासून धोका असल्‍याची तक्रार या भागातील नागरिकांनी पालिकेकडे नोंदवली होती. सातत्‍याने चार तक्रारी करूनही पालिकेने या गटाराच्‍या बंदिस्‍तीकरणाकडे दुर्लक्ष केले. आज या परिसरात राहणारी वृद्धा घरातून बाहेर पडली. बराच वेळ त्‍या घरी न परतल्‍याने नातेवाईक, तसेच इतरांनी शोध घेणे सुरू केले. शोधूनही त्‍या न सापडल्‍याने नागरिकांच्‍या काळजाचा ठोका चुकला. सर्वत्र शोध घेत असतानाच काही जणांनी धोकादायक गटार व उघडे असणाऱ्या चेंबरच्‍या परिसरातून आवाज येत असल्‍याचे जाणवले. यामुळे त्‍याठिकाणी जाऊन पाहणी केल्‍यानंतर त्‍यांना आतमध्‍ये वृद्धा जखमी अवस्‍थेत पडल्‍याचे दिसले. यानंतर काही नागरिक त्‍या खोल गटारात उतरले व त्‍यांनी जखमी अवस्‍थेतील वृद्धेस बाहेर काढले. नागरिकांना शोधकार्यात वेळ लागला असता, तर अप्रिय घटना घडण्‍याची शक्‍यता निर्माण झाली होती.
या गटाराच्‍या अनुषंगाने स्‍थानिकांनी चार वेळा पालिकेकडे तक्रारी केल्‍या होत्‍या. या तक्रारीनुसार कार्यवाही करण्‍याऐवजी पाहणी करत गटारावर झाकण टाकण्‍यासाठीच्‍या निधीची अनुपलब्‍धता असून, तो उपलब्‍ध झाल्‍यावर काम करण्‍यात येईल, असे पालिकेच्‍या वतीने नागरिकांना सांगण्‍यात येत आहे.

....................

54879
सातारा : धोकादायक गटारात पडलेल्‍या वृद्धेची सुटकेवेळी नागरिक.


-------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

Rahul Gandhi MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी’

Nagpur News : विमानासाठी गेट उघडताना काळाचा घाला! लोखंडी गेट अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; दुसरा गंभीर

Flydubai Attack: 'त्या' पायलटला सोडण्यासाठी क्रू मेंबर्स झाले आक्रमक! इस्रायली प्रवाशांचा खळबळजनक दावा; विमानात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT