विद्यानगर - येथील धोकादायक खाणीत पोहणारी मुले.
विद्यानगर - येथील धोकादायक खाणीत पोहणारी मुले. 
पुणे

पिंपरी-चिंचवड शहरातील दगडखाणी धोकादायक

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - शहरात अनेक ठिकाणी दगडखाणी आहेत. त्यात पाणी व गाळ साचलेला आहे. त्यात मुले पोहत असतात. दोन दिवसांपूर्वी मोईतील खाणीत बुडून मुलाचा मृत्यू झाला. या पार्श्‍वभूमीवर खाणींची सोमवारी पाहणी केली असता धक्कादायक वास्तव आढळून आले.

खराळवाडी, मोहननगर, दत्तनगर, विद्यानगर, संभाजीनगर, शाहूनगर, चिखली, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, वाकड, काळाखडक भागात दगडखाणी आहेत. त्यातील बहुतांश ठिकाणच्या खाणी बुजून टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. संभाजीनगरमधील खाणीचे सुरेख उद्यानात (बर्ड व्हॅली) रूपांतर केले आहे. पर्यटकांचे खास आकर्षण झाले आहे. काही खाणी धोकादायक झाल्या आहेत.  दुर्घटना घडू नये, यासाठी वेळीच उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे. 

खराळवाडीतील खाणीत गाळ 
येथील खाण खासगी मालकीची आहे. त्यात खराळवाडी, गांधीनगर, कामगारनगर भागातील सांडपाणी सोडले जाते. मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. गवत व काटेरी झुडपे वाढली आहेत. यामुळे दुर्गंधी व डासांचा उपद्रवही वाढला आहे. खाणीच्या काठावर धोकादायकपणे घरे बांधली आहेत. 

दत्तनगर खाण व्यापली जलपर्णीने
येथील खाणही एमआयडीसीतच आहे. खाणीत मोठ्या प्रमाणात पाणी व गाळ साचला आहे. संपूर्ण खाण जलपर्णीने व्यापली आहे. तिच्या काठावरच नागरिकांनी घरे उभारली आहेत. खाणीच्या काठावरील खडक खचल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. 

शाहूनगर खाणीची खोली अधिक
निगडी-भोसरी टेल्को रस्ता व स्पाइन रस्ता जोडणाऱ्या मुख्य रस्त्यालगत शाहूनगरची खाण आहे. त्यात पाणी साचलेले असून खोली जास्त आहे. शिवाय संरक्षण कठडे नसल्याने ती जास्त धोकादायक आहे.  

विद्यानगरमध्ये धोका अधिक
पिंपरी एमआयडीसीतील खाणीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तलावाचे स्वरूप तिला आले आहे. आजूबाजूला झाडी असल्याने अनेकजण आकर्षित होतात. सोमवारी काही शाळकरी मुले तिथे पोहताना आढळली. परंतु, सुरक्षा उपाययोजना नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT