‘डीएपी’ची टंचाई
खानदेशात कायम
युरिया, १०:२६:२६चाही अपुरा पुरवठा; कंपन्यांकडून लिंकिंगच्या अटी, शेतकऱ्यांसह विक्रेतेही अडचणीत
ॲग्रोवन वृत्तसेवा
जळगाव ः जिल्ह्यात डीएपी रासायनिक खताची टंचाई कायम आहे. यातच विविध खत कंपन्या लिकिंग करून खतांचा पुरवठा करीत असल्याची ओरड खत वितरक, विक्रेत्यांत कायम आहे.
युरिया, १०.२६.२६ ची अडचणदेखील आहे. खरीप हंगाम सुरू झाला असून, या हंगामात युरिया, १०.२६.२६ व डीएपी या खतांची मागणी कायम आहे. सध्या पाऊस नसल्याने कोरडवाहू क्षेत्रासाठीची मागणी कमी आहे. पण बागायती क्षेत्रात किंवा केळी, भाजीपाला पिकांसाठी खतांची मागणी कायम आहे. डीएपी, युरियाचा तुटवडा, समस्या दूर करण्याचे आव्हान कृषी विभागासमोर आहे.
चौकट
कंपन्या मुजोर
मध्यंतरी जिल्ह्यातील खत विक्रेत्यांनी लिंकिंगशिवाय खते न देणाऱ्या खतपुरवठादार, कंपन्यांविरोधात नाराजी व्यक्त करून संबंधितांवर कारवाई केली जावी, तंबी दिली जावी, अशी मागणी केली होती. कंपन्याच लिंकिंग करतात, यामुळे पुढे ही खते विक्रेत्यांना महाग पडतात. कंपन्यांनी लिंकिंग केलेल्या खतांत मोठी गुंतवणूक करावी लागते. लिंकिंगवर विविध अन्नघटक, अन्नद्रव्ये कंपन्या देतात. यात काही कंपन्यांची लिंकिंग केलेली खते दुय्यम दर्जाची असल्याचाही आरोप केला जातो. अशातच खानदेशात डीएपीचा पुरवठा रब्बीत कमी होता. त्याचा साठा पुरेसा दिसत होता. पण काही वितरकांकडून कृत्रीम टंचाईदेखील तयार केली जात होती. सध्या खतपुरवठा खरिपासंबंधी सुरू आहे. यात युरिया, १०.२६.२६ व डीएपीचा पुरवठा कमीच आहे. युद्धामुळे विद्राव्य खतांच्या किमती वाढल्या आहेत. यातच युद्धाच्या स्थितीमुळे खत आयातीवर परिणाम झाल्याचे कृषी विभाग म्हणतो आहे. प्रत्येक वितरक, विक्रेत्याकडील खतसाठा अॅपमध्ये किंवा कृषी यंत्रणांनी विकसित केलेल्या व्यवस्थेत ऑनलाइन शेतकरी लागलीच पाहू शकतो. जे वितरक, खत विक्रेते डीएपी व अन्य खते आपल्याकडे असूनही देणार नाहीत, त्यांची माहिती, लेखी तक्रार कृषी विभागाला द्यावी, असे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने म्हटले आहे. पण मुजोर खत वितरक, कंपन्या व काही खिसेभरू खत विक्रेते या अडचणीतही शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.
पॉइंटर
खत स्थिती दृष्टिक्षेपात
जिल्ह्यात केळी पट्ट्यात बारमाही खतांची मागणी आहे
केळी पट्ट्यात खतांबाबत किंवा खततुटवड्याची तक्रार वर्षभरापासून आहे.
जळगाव जिल्ह्यात सुमारे सव्वातीन लाख टन खतांचा पुरवठा खरिपात अपेक्षित आहे.
युरिया, पोटॅश व सिंगल सुपर फॉस्फेटचा पुरवठा संयुक्त खतांच्या तुलनेत अधिक राहील.
युरियाचा सुमारे ७८ हजार टन पुरवठा एकूण हंगामात अपेक्षित आहे.
पुरवठा लक्ष्यांकाच्या तुलनेत खते दाखल झालेली नसल्याची स्थिती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.