कुंदननगर, कासारवाडी - जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सेवारस्त्यावर होणाऱ्या पार्किंगमुळे झालेली वाहतूक कोंडी.
कुंदननगर, कासारवाडी - जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सेवारस्त्यावर होणाऱ्या पार्किंगमुळे झालेली वाहतूक कोंडी. 
पुणे

दापोडी-पिंपरी मार्गावर कोंडी नित्याचीच

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला होणाऱ्या वाहनांच्या पार्किंगमुळे कोंडी नित्याची झाली आहे. महामार्गावर दापोडी ते पिंपरी दरम्यानच्या रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे ग्रेडसेपरेटरमधील रस्ता वाहतुकीसाठी बंद असतो. वाहनचालकांना सेवारस्त्याचा वापर करावा लागतो. सेवारस्त्यावर वाहने उभी करण्याचे प्रमाण वाढल्यामुळे कोंडीत भर पडते.

दापोडीतील सीएमई चौकामध्ये पिंपरीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला दुचाकी वाहने उभी केलेली असतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांना अडकून पडावे लागते. फुगेवाडी चौकातही अशीच परिस्थिती आहे. नो पार्किंगचे फलक लावलेले असतानाही वाहने उभी असतात. या परिसरातील हॉटेलमध्ये येणारे नागरिक रस्त्यावर डबल पार्किंग करतात. कासारवाडी परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहने उभी असतात. पिंपरीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रिक्षाचालकांच्या थांब्यामुळे कोंडीचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.

मेट्रोचे काम संपण्यास अजून दोन वर्षांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे सेवारस्त्यावर नो पार्किंगमध्ये उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई होण्याची आवश्‍यकता आहे. 
- विक्रांत चौधरी, नागरिक

दापोडी ते पिंपरीदरम्यान सेवारस्त्यावर असणारे पीएमपीचे बसथांबे मेट्रोचे काम पूर्ण होईपर्यंत अन्यत्र हलविण्याची आवश्‍यकता आहे. कासारवाडी चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडवावी.
- राजेंद्र शिंदे, आकुर्डी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT