पुणे

पांचगणी : जावली तालुक्यात चोरट्यांची दहशत: दापवडी व वहागावात भितीचे वातावरण; पोलिसांच्या गस्तीची ग्रामस्थांची मागणी

CD

दापवडी, वहागाव परिसरात
चोरट्यांसह भुरट्यांचा वावर

मोटारची वायर चोरी; घरावडे दगडफेकीचे प्रकार

​पाचगणी, ता. १४ : जावळी तालुक्यातील दापवडी व वहागाव परिसरात सध्या चोरट्यांसह भुरट्या संशयितांचा वावर वाढला आहे. त्यामुळे स्थानिकांची झोप उडाली आहे. रात्रीच्या वेळी होणाऱ्या संशयास्पद हालचाली आणि चोरीच्या घटनांमुळे दोन्ही गावांतील नागरिकांत भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी दापवडी, वहागाव ग्रामस्थांनी केली आहे.
​घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दापवडी येथील शेतकरी मधुकर रांजणे व राजाराम कोंडीबा रांजणे यांच्या शेतातील बोअरवेलवरील मोटारींना जोडलेली तांब्याची विजेची वायर चोरट्यांनी रात्री लंपास केली. वायर चोरी झाल्यामुळे दोन्ही शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. कामातही खोळंबा निर्माण झाला.
​दरम्यान, चोरीच्या या घटनेसोबतच वहागाव, दापवडी परिसरात इतरही प्रकार घडल्याने भीती वाढली आहे. काल रात्री धरणग्रस्त वहागाव येथील रहिवासी हेमंत राजपुरे यांच्या घरावर अज्ञातांकडून दगडफेक झाली. रात्रीच्या वेळी घराच्या छतावर दगड पडल्याने कुटुंबीय घाबरले. त्याच रात्री दापवडी गावात एक अनोळखी संशयास्पद व्यक्ती घरांभोवती फिरताना आढळून आली. ही बाब लक्षात येताच परिसरातील महिलांनी प्रसंगावधान राखून आरडाओरडा केला. महिलांच्या आवाजाने ग्रामस्थ जागे झाले. त्यांनी संशयिताचा पाठलाग केला. मात्र, अंधारामुळे तो पसार होण्यात यशस्वी झाला.
​एकाच रात्री घडलेल्या या चोरी व दगडफेकीच्या घटनांमुळे दापवडी, वहागाव परिसरातील महिला, वृद्ध आणि ग्रामस्थ दहशतीखाली आहेत. चोरट्यांचे धाडसही वाढले आहे. पोलिसांनी परिसरात रात्रगस्त वाढवावी, संशयित चोरट्यांचा तत्काळ शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करावा, अशी एकमुखी मागणी दोन्ही गावांतील संतप्त ग्रामस्थांनी केली आहे.

..............................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Release : कोयना धरणातुन पाण्याचा विसर्ग वाढवला; १५ हजार ५८ क्युसेक पाण्याचा विसर्ग, धरणाचे दरवाजे दोन फुटावर

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Kalamb News : नासा अंतराळ संशोधन केंद्र अभ्यास दौरा भेटीसाठी कळंब तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांची निवड

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

SCROLL FOR NEXT