sinhgad.jpg 
पुणे

सिंहगडावरील पायवाटेवर कोसळली दरड

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला (पुणे) : निसर्ग चक्रीवादळामुळे सिंहगडाच्या पायवाटेवर दरड कोसळली. वन विभागाच्या वतीने दरड काढण्याचे काम सुरू आहे. निसर्ग चक्रीवादळ व त्यावेळी पडलेल्या पावसामुळे दरड पडणे झाडांची पडझड झाली आहे. हॉटेल चालकांचे नुकसान झाले आहे.सिंहगडाच्या पार्किंगपासून पुणे दरवाज्याकडे जाताना शंभर दीडशे मीटरवर दरड पडली आहे. ती पायवाटेवर पडल्याने रस्ता बंद झाला आहे. त्यातील काही दगड घाट रस्त्यावर पडले होते.

रस्त्यावरील दगड बाजूला केले आहेत. तसेच, घाट रस्त्याने गडावर जाताना पहिल्या वळणावर दगड मातीचा खराळ खाली पडला आहे. नेहमीच्या ठिकाणी किरकोळ दगडी पडल्या आहेत. पाहणीनंतर, त्यांनी गडावरील पडलेली झाडे, दरड काढणे, रस्त्यातील दगड तातडीने काढून घेण्याच्या सूचना वन विभागाचे सहायक उपवनसंरक्षक संजय कडू यांनी याबाबत पाहणी केली. त्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी दीपक पवार यांना केल्या आहेत. गडावरील सर्व हॉटेलचे पत्रे, प्लॅस्टिक कागद उडून गेले आहेत. बांबू लोखंडी मोडून पडले आहेत. गडावरील सर्व हॉटेल चालकांचे नुकसान झाले आहे.

सिंहगड घाट रस्ता बंद
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या सूचनेनुसार गड किल्ले व पर्यटन बंद आहे. हॉटेल बंद आहेत. या नियमानुसार डोणजे व अवसरवाडी मार्गे गडावरील घाट रस्ता वाहतूक बंद आहे. तसेच गडावरील हॉटेल ही बंद आहेत. पर्यटकांना गडावर येण्यास पुढील आदेश येईपर्यत बंद आहे. अशी माहिती वन विभागाचे सहायक उपवनसंरक्षक संजय कडू यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2400 crore loss: आयपीएलला प्रत्येक वर्षाला २४०० कोटींचा फटका बसतोय, पण कसा? मोदीने गणित समजावून सांगितलं

Arshdeep Singh Girlfriend: अर्शदीप सिंगची गर्लफ्रेंड आहे 'ही' अभिनेत्री? एका टॅटूमुळे समोर आलं मिस्ट्री गर्लचं रहस्य, Viral Post

‘लाडकी विद्यार्थिनी’ योजना रखडली, दीड हजार मुलींचे भवितव्य नावाच्या वादात

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील साबळेवाडी, शिंदेवाडी, खुपिरे परिसरात २४ शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या केबलची चोरी

कतरिनाच्या गाण्यावर गौतमीचा भन्नाट डान्स, एन्ट्री स्टेप पाहून नेटकरी थक्क, Viral Video

SCROLL FOR NEXT