पुणे

दर्यापूर बाजार समिती

CD

संख्याबळाअभावी अविश्वास
प्रस्ताव बारगळला

दर्यापूर बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे पदावर कायम

ॲग्रोवन वृत्तसेवा
अमरावती : दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव आवश्यक संख्याबळाअभावी फेटाळला गेला. प्रक्रियेदरम्यान एक संचालक अनुपस्थित राहिल्याने प्रस्तावाला आवश्यक पाठिंबा मिळू शकला नाही. त्यामुळे गावंडे हे सभापतीपदी कायम राहिले.
विरोधी गटातील १२ संचालकांनी सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करत जिल्हा निबंधकांकडे स्वाक्षरीयुक्त पत्र सादर केले होते. त्यानुसार जिल्हा निबंधक राजेश भुयार यांच्या उपस्थितीत अविश्वास प्रस्तावावरील कायदेशीर प्रक्रिया पार पडली.
प्रस्ताव मंजूर होण्यासाठी विरोधी गटाच्या सर्व १२ संचालकांची उपस्थिती आवश्यक होती. मात्र, ऐनवेळी एक संचालक अनुपस्थित राहिल्याने आवश्यक संख्याबळ पूर्ण झाले नाही. त्यामुळे अविश्वास प्रस्ताव नामंजूर झाल्याचे जिल्हा निबंधक राजेश भुयार यांनी स्पष्ट केले. गेल्या तीन वर्षांपासून सभापती गावंडे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचा कारभार सुरू आहे. अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेल्याने दर्यापूर बाजार समितीतील विद्यमान नेतृत्व कायम राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Political: इम्रान खान यांच्या बहिणीला घरातून ताब्यात घेतले; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात कारवाई

Amravati College Student Case : कॉलेज तरुणीला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेत ठेवले संबंध, फोटो व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; १ लाख ३२ हजार हडपले

Western Vidarbha Crop Damage : पावसाच्या खंडाने पिके संकटात शेतकऱ्यांना भरीव मदतीची ग्वाही; मुदतपूर्व पीक पाहणी पूर्ण करण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश

Marathi News Live Updates : संपूर्ण राज्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सचा कस लागणार; लवलिना-नरेंद्रची थेट उपांत्यपूर्व फेरीत सुरुवात

SCROLL FOR NEXT