पुणे

एक्सेल व एआयच्या मदतीने डेटा अ‍ॅनालिसिस कार्यशाळा

CD

पुणे, ता. २७ : व्यवसायातील निर्णय अधिक अचूक आणि परिणामकारक घेण्यासाठी डेटाचे विश्लेषण करण्याचे कौशल्य विकसित करणारी दोन दिवसीय प्रात्यक्षिक कार्यशाळा ३१ ऑक्टोबर व १ नोव्हेंबरला आयोजित केली आहे. मायक्रोसॉफ्ट एक्सेल आणि एआयच्या साहाय्याने डेटा स्वच्छ करणे, त्याचे विश्लेषण करणे, आलेख व अहवाल तयार करणे तसेच त्यातून उपयुक्त निष्कर्ष काढण्याचे प्रशिक्षण या कार्यशाळेत दिले जाणार आहे. कार्यशाळेत डेटा अ‍ॅनालिसिसची मूलभूत माहिती, डेटा क्लिनिंग व तयारी, एक्सेलमधील महत्त्वाची सूत्रे व फंक्शन्स, विविध प्रकारच्या डेटावर काम करणे, सॉर्टिंग, फिल्टरिंग व फॉरमॅटिंगबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच पिव्होट टेबल्स व पिव्होट चार्ट्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणातील डेटाचे विश्लेषण करण्याचे तंत्र शिकवले जाईल. याशिवाय चार्ट्स, डॅशबोर्ड आणि डेटा व्हिज्युअलायझेशन तयार करणे, एआयच्या साहाय्याने डेटा विश्लेषण अधिक जलद व प्रभावी करणे आणि प्रत्यक्ष व्यावसायिक उदाहरणांवर आधारित डेटा अ‍ॅनालिसिस करण्याचा सराव करून घेतला जाणार आहे. डेटामधून महत्त्वपूर्ण माहिती मिळवून त्याचा व्यवसायातील निर्णय प्रक्रियेसाठी प्रभावी वापर करण्याचे कौशल्य विकसित करण्याची संधी सहभागींना मिळणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६

हाउसिंग सोसायटी
मॅनेजर होण्याची संधी
गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन अधिक व्यावसायिक पद्धतीने करण्यासाठी प्रशिक्षित सोसायटी मॅनेजर्सची गरज वाढत आहे. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये मिळावीत, यासाठी एसआयआयएलसी आणि पुणे को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी अँड अपार्टमेंट फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय ‘हाउसिंग सोसायटी मॅनेजर प्रमाणपत्र प्रशिक्षण’ आयोजित करण्यात आले आहे. नोव्हेंबर बॅचसाठी नोंदणी सुरू झाली असून, हे प्रशिक्षण २७, २८ आणि २९ नोव्हेंबरला सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० या वेळेत पुण्यात होणार आहे. प्रशिक्षणात सोसायटी मॅनेजरची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, मॅनेजिंग कमिटीच्या बैठकीचा अजेंडा तयार करणे, इतिवृत्त लेखन, शेअर्स व व्याज हस्तांतरण प्रक्रिया, देखभाल बिले तयार करणे आणि टीडीएस भरणे यांविषयी मार्गदर्शन केले जाईल. याशिवाय ऑडिटसाठी चेकलिस्ट, लेखापरीक्षण अहवाल, वार्षिक विवरणपत्रे, विविध रजिस्टर व फॉर्म्स, पर्यावरणपूरक उपक्रम आणि सुरक्षा उपाययोजना यांचाही अभ्यास करता येईल. महासंघाच्या अनुभवी प्रशिक्षकांकडून प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण आणि शंकांचे निरसन केले जाईल. हाउसिंग सोसायटी मॅनेजर म्हणून पूर्णवेळ किंवा अर्धवेळ काम करू इच्छिणारे, गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी व कमिटी सदस्य, रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिक तसेच सोसायटी व्यवस्थापनाशी संबंधित सेवा देऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dr. Neelam Gorhe : मुलींच्या जन्माचे स्वागत घरातूनच व्हावे; मुलगा-मुलगी समानतेसाठी संपूर्ण कुटुंबाचे समुपदेशन करण्याच्या सूचना

Pune Crime : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला अखेर २० वर्षांनंतर अटक

JIO IPO : १० लाख कोटींहून अधिक मूल्यांकनाचा देशातील पहिलाच महा-आयपीओ; ३० लाख कोटींच्या ऐतिहासिक टप्प्याकडे रिलायन्सची वाटचाल

CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

Uruli Kanchan Crime : विवाहित महिलेला 'तुमचे पार्सल आले आहे' असा बनाव रचून फोन करायचा, तिच्याशी अश्लील बोलून एकांतात भेटण्याची मागणी करणाऱ्या नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT