DHK26A05194
पिंपरी जलसेन (ता.पारनेर) : दत्तकृपा पतसंस्थेच्या मुख्य कार्यालय इमारतीचे लोकार्पण करताना गीतांजली शेळके, विश्वनाथ कोरडे, विशाल दाते, लहू थोरात आदी.
पारदर्शक कारभारातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ
गीतांजली शेळके : दत्तकृपा पतसंस्थेच्या नूतन मुख्य कार्यालयाचे लोकार्पण
टाकळी ढोकेश्वर, ता. २१ ः ग्रामीण भागातील पतसंस्था स्थानिक अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. गावातील व्यावसायिक, शेतकरी व गरजू नागरिकांच्या आर्थिक गरजा भागविण्याचे महत्त्वपूर्ण काम, त्या करीत आहेत. विश्वास, पारदर्शकता आणि बचतीच्या माध्यमातून संस्थेची प्रगती साधता येते, असे प्रतिपादन महानगर बँकेच्या अध्यक्षा गीतांजली शेळके यांनी केले.
पिंपरी जलसेन (ता.पारनेर) येथील दत्तकृपा ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी भाजप नेते विश्वनाथ कोरडे, सहायक निबंधक विशाल दाते, अनिल वाढवणे, सरपंच सुरेश काळे, नारायण थोरात, डॉ. सुनील कदम, डॉ. हेमलता अडसरे, बाळासाहेब दाते, संजय भगत, अरुण ठाणगे, सखाराम औटी, डॉ. आबासाहेब खोडदे, अण्णासाहेब बढे, सुभाष बेलोटे, शिवाजी मोरे, भागा गायकवाड, शिवाजी थोरात, रामचंद्र गुंड, बन्सी सातपुते, बाळासाहेब लाळगे आदी उपस्थित होते.
शेळके म्हणाल्या, संस्थेने ठेवी, कर्जवाटप आणि इतर आर्थिक व्यवहारांची आकडेवारी नागरिकांना दिसेल अशा पद्धतीने फलकावर मांडली आहे. हा पारदर्शक कारभाराचा आदर्श आहे. बचतीतून संस्थेने सुसज्ज इमारत उभी केली. संस्थेचे अध्यक्ष लहू थोरात, उपाध्यक्ष रामदास शेळके यांनी प्रगतीमागे पदाधिकारी, संचालक, कर्मचारी आणि सभासदांचे सामूहिक योगदान असल्याचे सांगितले.
----------
संस्थेचा कारभार पारदर्शक, नियमबद्ध आणि सभासद केंद्रित असणे आवश्यक आहे. ठेवीदारांचा विश्वास हीच खरी ताकद असून, सक्षम आर्थिक नियोजन व जबाबदार कर्जवाटपातून पतसंस्थांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक बळ द्यावे.
-विशाल दाते, सहायक निबंधक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.