पुणे

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात मोठी खेळी; माजी आमदार दत्तात्रय सावंत अपक्ष नाही, भाजप की मविआ? गुलदस्त्यात

CD

माझ्यासाठी भाजपबरोबरच ‘मविआ’चेही दरवाजे खुले
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात मोठी खेळी; माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या विधानाने चर्चा

सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. २० : पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापू लागले आहे. माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी यावेळी अपक्ष निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. ‘‘माझ्यासाठी भाजपबरोबरच महाविकास आघाडीचे दरवाजे खुले आहेत, लवकरच निर्णय जाहीर करेन,’’ असे विधान सावंत यांनी केल्याने शिक्षक मतदारसंघात चर्चांना उधाण आले आहे.
यापूर्वी दोन वेळा अपक्ष लढलेले सावंत एकदा विजयी झाले होते, तर गत निवडणुकीत त्यांचा थोडक्यात पराभव झाला होता. यावेळी मात्र त्यांनी सावध भूमिका घेत थेट पक्षाकडून लढण्याचा डाव टाकला आहे. त्यांच्या या निर्णयाचे समर्थकांमधूनही स्वागत होत आहे. पंढरपूर येथे प्रमुख शिक्षक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये श्री. सावंत यांनी आपला राजकीय निर्णय जाहीर केला आहे.
विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांच्याविषयी शिक्षकांमध्ये मोठी नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यंदा इच्छुकांची संख्या वाढली आहे. यामध्ये पंढरपूरच्या श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे आणि शिवसेनेचे मंगेश चिवटे यांनी तयारी सुरू केली आहे. अशातच सावंत यांनी भाजप किंवा महाविकास आघाडीकडून लढण्याचा निर्णय जाहीर केल्याने ते नेमके कोणत्या बाजूने लढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही आघाड्यांकडून आपल्याला विचारणा होत असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले आहे. २०१४ साली सावंत हे अपक्ष म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. २०२० मध्ये मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर यांनी त्यांचा पराभव केला होता.
दरम्यान, सावंत कोणत्या पक्षाचे तिकीट घेणार हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी त्यांच्या भूमिकेमुळे यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि बहुरंगी होणार, हे निश्चित मानले जात आहे.

चौकट...
२०२० चा निकाल काय होता...
२०२० साली पार पडलेल्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत एकूण ७२,५४६ मतदारांची नोंदणी झाली होती. त्यापैकी ५२,९८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये जयंत आसगावकर (विजयी, महाविकास आघाडी) : १६,८७४ मते, दत्तात्रय सावंत (अपक्ष) : १३,७६० मते, जितेंद्र पवार (भाजप) : ५,७९५ मते मिळाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

मालमत्ता ४ कोटींची, मग १३ कोटींची रोल्स रॉयस कुठून आली? मैथिली ठाकूरच्या व्हिडीओवरून CAचा सवाल, चौकशीची मागणी

Bihar viral video case: जमुई अल्पवयीन मुलीचं छेडछाड प्रकरण! राष्ट्रीय महिला आयोग आक्रमक, पोलीस महासंचालकांना कठोर निर्देश

Lohara Crime : पतीने धारदार शस्त्राने वार करून पत्नीचा केला खून; हल्ल्यानंतर पतीने स्वतःवर वार करून पोलिस ठाण्यात झाला हजर

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT