Manohar Joshi and Dattu Dongare Sakal
पुणे

Dattu Dongare : ‘दत्तू शिवसेनेचा मुख्यमंत्री झालाय, तू चप्पल घाल’; गोखलेनगरमध्ये जाऊन मनोहर जोशीं केला होता शिवसैनिकाचा सन्मान

जो पर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार नाही, तो पर्यंत पायात चप्पल घालणार नाही अशी शपथ पुण्यातील दत्तु डोंगरे या शिवसैनिकाने केली.

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - जो पर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार नाही, तो पर्यंत पायात चप्पल घालणार नाही अशी शपथ पुण्यातील दत्तु डोंगरे या शिवसैनिकाने केली. दोन वर्ष चप्पल न घालता हा शिवसैनिक सर्वत्र फिरत होता, राज्यात १९९५ ला शिवसेना भाजप युतीची सत्ता आली, मुख्यमंत्रिपदी मनोहर जोशी यांची नियुक्ती झाली.

त्यावेळी त्यांना डोंगरे यांनी घेतलेल्या शपथेबद्दल माहिती मिळाली. पुणे दौऱ्यावर असताना मनोहर जोशी हे गोखलेनगरमध्ये डोंगरे यांच्या घरी गेले. जंगी कार्यक्रमात ‘दत्तू शिवसेनेचा मुख्यमंत्री झालाय, तू चप्पल घाल’ असे सांगत त्यांनी सोबत आणलेली चप्पल डोंगरे घालायला लावली.

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या आठवणींना उजाळा देताना दत्तू डोंगरे यांचा मुलगा आणि ठाकरे गटाचा शिवाजीनगरचे विभागप्रमुख प्रवीण डोंगरे यांनी ही आठवण सांगितली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावाने दत्तू डोंगरे ये शिवसेनेत आले. त्यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही तो पर्यंत चप्पल घालणार नाही अशी शपथ १९९३ ला घेतली. १९९५ ला विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर डोंगरे यांनी विना चप्पल घरोघरी जाऊन प्रचार केला. या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आणि मुख्यमंत्रिपदी जोशी विराजमान झाले.

प्रवीण डोंगरे म्हणाले, ‘मुख्यमंत्री वडिलांना भेटण्यासाठी घरी येणार असल्याने वडिलांना मोठी तयारी केली. मुख्यमंत्री घरी आले, सर्वांशी बोलले. नंतर झालेल्या कार्यक्रमात माझ्या वडिलांना त्यांनी चप्पल घालायला लावली. माझ्या वडिलांचे निधन २०१६ मध्ये झाले, पण जोशी सरांचा अनुभव मला देखील घेता आला, मनोहर जोशी सामान्य शिवसैनिकावर प्रेम करणारे नेते होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT