thief 
पुणे

दौंडला एका रात्रीत 12 दुकाने फोडली आणि नेले काय तर... 

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : दौंड शहरात लॉकडाउनच्या काळात एका चोरट्याने एका रात्रीत तब्बल 12 ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला, मात्र फक्त नगरपालिका कार्यालयातील तळघरामधील एका दुकानातून वॉटर प्युरिफायर चोरून नेला आहे. चोरट्याने तळघरांमधील दुकानांनाच लक्ष्य केले होते. 

दौंड पोलिस ठाण्यासमोरील "प्रदीप प्लाझा' इमारतीच्या तळघरात 2 मे रोजी मध्यरात्री गणेश झेरॉक्‍स, चेतन झेरॉक्‍स, अजय डीटीपी सेंटर या दुकानांची; तर जैन स्थानकासमोरील व्यापार संकुलातील नवले प्रिंटिंग, आदर्श कृषी सेवा केंद्र, गणेश झेरॉक्‍स, चुंबळकर चहा या दुकानांची कुलपे तोडण्यात आली. तसेच, यशवंत विविध कार्यकारी सहकारी संस्था व ऍड. पवार यांच्या कार्यालयाचे कुलूप तोडून काही ठिकाणी शटर उचकटण्यात आले. "ललित अपार्टमेंट'मधील तळघरातील प्रदीप शहा यांचे किराणा मालाच्या गोदामाची कुलपे तोडण्यात आली, परंतु काही चोरीला गेले नाही. नगरपालिका कार्यालय इमारतीच्या तळघरातील समीर इलेक्‍ट्रॉनिक्‍स व त्याशेजारी बॅगेच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडण्यात आले. त्यापैकी चोरट्याने "समीर इलेक्‍ट्रॉनिक्‍स'चे शटर उचकटून व लोखंडी ग्रील तोडून सतरा हजार रुपयांचा वॉटर प्युरिफायर चोरून नेला. नगरपालिका कार्यालयासाठी खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेले असतानाही तळघरात दोन ठिकाणी चोऱ्या झाल्या आहेत. 

टी - शर्ट, बर्मुडा पॅन्ट घातलेला आणि हातात कटावणी घेऊन फिरणाऱ्या या तरुणाने 11 ठिकाणी शटर उचकटले किंवा कुलूप तोडले, परंतु तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांकडे बघितले देखील नाही. जेथून वॉटर प्युरिफायर चोरला, तेथील सीसीटीव्ही कॅमेरा मात्र त्याने तोडला आहे. बाजारपेठ आणि निवासी इमारतींमध्ये झालेल्या या प्रकाराबाबत संबंधित दुकानदारांनी दौंड पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Blow : महेंद्रसिंग धोनीनंतर CSK चा आणखी एक मॅच फिनिशर झाला जखमी, २-३ सामन्यांना मुकणार; IPL 2026 मध्ये उद्या RR ला भिडणार

काँग्रेसकडून युद्धाचा राजकीय फायद्यासाठी वापर, जनतेचा जीव धोक्यात टाकतायत; PM मोदींचा घणाघात

Pune Drowning: सोरतापवाडीतील विहिरीत पोहताना २० वर्षीय तरुणाचा दम कोंडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

Solapur Farmers Protest: मंगळवेढ्यात ३०,७४२ शेतकऱ्यांचा पिकविमा थकित; विमा कंपनीच्या दिरंगाईविरोधात संताप, आंदोलनाची चेतावणी

Hardik Pandya : मुंबई इंडियन्सकडून १६.३५ कोटी पगार; हार्दिकने गर्लफ्रेंडसाठी खरेदी केली कोट्यवधींची कार... भारतातील पहिलाच मॉडल

SCROLL FOR NEXT