sakal
पुणे

दौंड : डॅाक्टर महिलेचा विनयभंग, तरूणाला अटक

दौंड शहरात एका डॅाक्टर महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी राजेश उर्फ राजू नारायण गायकवाड या तरूणाला अटक करण्यात आली आहे.

प्रफुल्ल भंडारी

दौंड : दौंड शहरात एका डॅाक्टर महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी राजेश उर्फ राजू नारायण गायकवाड या तरूणाला अटक करण्यात आली आहे. दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद घुगे यांनी या बाबत माहिती दिली. २४ सप्टेंबर रोजी राजेश नारायण गायकवाड (वय ३०, रा. भीमनगर, दौंड) याने संबंधित डॅाक्टर महिला ज्या खासगी रूग्णालयात नेमणुकीस आहे तेथे जाऊन ` माझे तुझ्यावर प्रेम आहे ` असे सांगत त्यांचा हात पकडून विनयभंग केला.

डॅाक्टर महिलेने प्रतिकार करून जाब विचारला असता राजेश गायकवाड याने शिवीगाळ करीत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या बाबत डॅाक्टर महिलेने २५ सप्टेंबर रोजी रात्री फिर्याद दाखल केली. दाखल फिर्यादीवरून राजेश नारायण गायकवाड याच्याविरूध्द भारतीय दंड विधान कलम ३५४ ( विनयभंग व बलप्रयोग करणे ), कलम ५०४ ( शांतताभंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे) व कलम ५०६ ( फौजदारीपात्र धाकदपटशा करणे) अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. फौजदार भगवान पालवे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT