पुणे

किरकोळ वादातून कुटुंबावर जीवघेणा हल्ला

CD

दौंड, ता. २५ :  वाहनाच्या नुकसानीवरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना दौंड शहरात घडली आहे. रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या कुटुंबावर कोयता आणि हॉकी स्टिकने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी ११ जणांविरुद्ध दौंड पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यश गायकवाड हे सोमवारी (ता. २४) दुपारी त्यांच्या आईच्या नियमित तपासणीसाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात आले होते. गाडीतून उतरत असताना एका दुचाकीने त्यांच्या कारला धडक दिली. झालेल्या नुकसानीची भरपाई गायकवाड यांनी दुचाकीस्वार कृष्णा भूल याच्याकडे मागितली. भूल याने चायनीज खाद्यपदार्थांच्या गाडीचा मालक अश्पाक सय्यद याला बोलावून घेतले.
मात्र, सय्यदने नुकसानभरपाई देण्यास नकार देत गायकवाड यांना शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळी मध्यस्थी करण्यासाठी आलेला त्यांचा नातेवाईक मंथन गोरे याचे डोके कारवर आपटण्यात आले, तर झहीर सय्यद याने स्वानंद गोरे यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. हल्लेखोरांकडे पिस्तूल आणि हॉकी स्टिकसारखी घातक शस्त्रे होती, असे फिर्यादीत म्हटले आहे. भांडण सोडविण्यासाठी पुढे आलेल्या गायकवाड यांच्या आई आणि आजी यांनाही धक्काबुक्की करण्यात आली.
याप्रकरणी यश गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सज्जद शौकत सय्यद, तबरेज शौकत सय्यद, झहीर नजीर सय्यद (तिघे रा. पर्ल पार्क अपार्टमेंट, लिंगाळी, ता. दौंड), अशपाक अन्सार सय्यद (रा. बालाजीनगर, लिंगाळी, ता. दौंड), कृष्णा भूपेंद्र भूल (सध्या रा. गोपाळवाडी, ता. दौंड; मूळ रा. अछाम, नेपाळ), अमोल ज्ञानेश्‍वर मुळे (रा. शिवाजीनगर, दौंड) आणि अन्य पाच अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा प्रयत्न, बेकायदा जमाव जमविणे आणि घातक हत्यारांनी दुखापत करणे या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सहा संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना शुक्रवार(ता. २८)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.
- अमोल गवळी,
सहाय्यक पोलिस निरीक्षक, दौंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT