पुणे

दौंडच्या वनक्षेत्राचे रूप पालटणार

CD

खुटबाव, ता. ७ : दौंड तालुक्यातील पाटस, रोटी, कुसेगाव आणि पडवी भागातील सुमारे २४०० एकर वनक्षेत्राचा सर्वंकष विकास आराखडा तयार करावा, असे निर्देश आमदार राहुल कुल यांनी वनविभागाला दिले. या आराखड्यात मृदा व जलसंधारण, वृक्ष लागवड आणि पर्यटन विकासाची कामे घ्यावीत, असेही त्यांनी सांगितले.
तालुक्यातील वनविभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांसाठी पुण्यातील गोखलेनगर येथील वनभवनमध्ये, मुख्य वनसंरक्षक कार्यालयात आमदार कुल यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते. बैठकीला वनसंरक्षक (पुणे वनवृत्त) आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक (वनविभाग पुणे) अभिजित वायकोस, विभागीय वन अधिकारी अमोल थोरात आणि सहायक वनसंरक्षक अतुल जैनक आदी उपस्थित होते.
यासंदर्भात आमदार कुल म्हणाले की, या बैठकीमध्ये दौंडमधील वनक्षेत्रात अनेक मोठे तलाव आहेत. त्यांचे खोलीकरण आणि इतर आवश्यक कामे करून पाणीसाठ्यात वाढ करावी. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करावेत आणि वनविभाग व जलसंधारण विभाग यांनी संयुक्तपणे हे काम मार्गी लावावेत, असे निर्देशही त्यांनी दिले. या कामांमुळे परिसरातील शेती, पिण्याचे पाणी आणि वन्यजीवांना मोठा फायदा होणार आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्याच्या वावरामुळे नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे मानव–बिबट संघर्ष रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात, अशा स्पष्ट सूचना आमदार कुल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. दौंड तालुक्यातील अनेक खाजगी जमिनींवर वनविभागाच्या चुकीच्या नोंदी झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आणि जमीनधारकांना जमिनीचे व्यवहार, कर्ज प्रकरणे आणि शासकीय योजनांचा लाभ घेताना अडचणी येत आहेत. या चुकीच्या नोंदी रद्द करण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.
तालुक्यासाठी विविध पर्यटन प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून, प्रस्तावांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. हे प्रस्ताव लवकरात लवकर प्रत्यक्षात उतरावेत यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश आमदार कुल यांनी दिले. यामुळे दौंडला पर्यटन नकाशावर नवी ओळख मिळेल आणि स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

तालुक्याची वनसंपदा मोठी ताकद
तालुक्याची वनसंपदा ही आपली मोठी ताकद आहे. निसर्गाचे संवर्धन, जलसमृद्धी, पर्यटनातून रोजगारनिर्मिती, शेतकऱ्यांना न्याय आणि नागरिकांची सुरक्षितता या सर्व आघाड्यांवर तालुक्याला पुढे नेण्यासाठी या कामांचा सातत्याने पाठपुरावा करणार आहे, असे आमदार कुल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gevrai Cylinder Blast Fire Accident News : गेवराईत दिवाळीत गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटात चार जण गंभीर जखमी; चार घरे व दुचाकी जळून खाक, संजयनगर भागातील दुर्घटनेने सर्वत्र हळहळ

यंदाची दिवाळीही सीमेवरील जवानांसोबत! पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

Payal Jhambre Case : हुंडाबळी प्रकरणाचा तपास वेगवान; पायल झांबरे प्रकरणात ३५ तोळे सोने, मोबाईल व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात, पतीसह सासू-सासऱ्याच्या कोठडीत वाढ

अमेरिकेत खळबळ! पत्नीने AIच्या मदतीने रचला पतीच्या हत्येचा कट? ChatGPTच्या विरोधात खटला दाखल

Latest Marathi News Live Update: शरद पवारांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे नेते सिल्वर ओकवर; तीन तासांपासून बैठक

SCROLL FOR NEXT