दौंड, ता. १० : दौंड शहर आणि लिंगाळी परिसरात रविवारी (ता. ९) मध्यरात्री दोन बंद सदनिका फोडून चोरट्यांनी साडेदहा तोळे सोने, एक किलो चांदी आणि ५४ हजार रुपयांची रोकड लंपास केली. याप्रकरणी दौंड पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पहिली घटना लिंगाळी येथील पद्मावतीनगरमध्ये घडली. पंचायत समितीचे कर्मचारी नितीन बाळासाहेब नवले यांच्या बंद सदनिकेतून साडेनऊ तोळे सोन्याचे दागिने (गंठण, नथ, कर्णफुले) आणि चार हजार रुपये चोरीला गेले. दुसरी घटना डिफेन्स कॉलनीतील स्वप्नसागर अपार्टमेंटमध्ये घडली. येथे अमित ईश्वरलाल चंडालिया यांच्या घरातून चोरट्यांनी एक किलो चांदी, सव्वा तोळ्याचा सोन्याचा हार आणि ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. पोलिस अंमलदार बापू राटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन नवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.