पुणे

दौंडमधील अवजड वाहतूक शहराबाहेर वळविण्याची मागणी

CD

दौंड, ता. २६ : दौंड शहरातून जाणाऱ्या अष्टविनायक मार्गावरील नगर मोरी चौक ते भीमनगर या मुख्य रस्त्यावरून होणारी अवजड वाहतूक बंद करून ती शहराबाहेरील मार्गाने वळवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत पक्षाच्या उद्योग विभागाचे शहराध्यक्ष गौरव सरनोत व परिसरातील व्यापाऱ्यांनी दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांना भेटून एका निवेदनाद्वारे ही मागणी केली. दौंड ते श्री क्षेत्र सिद्धटेक या अष्टविनायक मार्गावरील नगर मोरी चौक ते भीमनगर या मार्गावर मुख्य बाजारपेठ, खासगी शाळा, महाविद्यालय, रुग्णालये, राष्ट्रीयीकृत बॅंक, खासगी वित्तीय संस्थांचे कार्यालय, तलाठी कार्यालय आणि अनेक दुकाने आहेत. बाजारपेठ व शाळांमुळे दिवसभर विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, ग्राहक आणि पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. शहरातील अनेक अंतर्गत रस्तेही या मुख्य मार्गाला जोडलेले असल्याने वाहतुकीचा ताण वाढत आहे. या मार्गावरून क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणारी वाहने, कंटेनर, अवजड मालवाहू ट्रक आणि मोठ्या बस वेगाने जात असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होते. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात वारंवार किरकोळ अपघात घडत आहेत. यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण होत असून, वादावादीचे प्रसंगही निर्माण होत आहेत. वाहतूक कोंडी आणि वादाच्या घटनांचा स्थानिक व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असून, व्यापारावरही परिणाम होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, डंपर, मालवाहू ट्रक आणि इतर अवजड वाहने दौंड शहराबाहेरील पर्यायी मार्गाने वळवावीत, अशी मागणी निवेदनात नमूद केली आहे.

Missile attack: सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला; येमेनमधील हूती बंडखोरांचा दावा

‘राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत, असं मला कधीच वाटलं नाही’; सोनिया गांधी यांचा मोठा खुलासा

Latest Marathi News Live Update : शेतकरी प्रोत्साहन निधीच्या प्रतीक्षेत, कर्जमाफीच्या चार याद्या जाहीर; वर्ष उलटूनही ५० हजारांची मदत खात्यात जमा नाही

Pune Crime : पंचतारांकित हॉटेलमधील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस; मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका

CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

SCROLL FOR NEXT