पुणे

दौंडमधील बाजारात ज्वारी ५२५१ रुपये क्विंटल

CD

दौंड, ता. २६ : दौंड तालुक्यात ज्वारीची आवक वाढली असून बाजारभावात प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल तब्बल ४० रुपयांची वाढ झाली आहे. ज्वारीची १४७ क्विंटल आवक झाली असून त्यास किमान १७०० तर कमाल ५२५१ रुपये क्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे. मागील आठवड्यात ज्वारीची ११४ क्विंटल आवक होऊन त्यास किमान १७०० तर कमाल ५२११ रुपये बाजारभाव मिळाला होता.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजार व यवत उपबाजारात भुसार मालाची आवक घटली असून बाजारभाव स्थिर आहे. केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक वाढली असून बाजारभाव स्थिर आहे. पाटस उपबाजार बंद होता. दौंड मुख्य बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली असून बाजारभाव स्थिर आहे. दौंड मुख्य बाजारात कोथिंबिरीची १२३४२ जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० तर कमाल ८०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. मेथीची ७१७५ जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० रुपये , तर कमाल ८०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. शेपूची ३०० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ५००, तर कमाल ७०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. कांदापातीची १२०० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ३०० रुपये , तर कमाल ५०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला.


तालुक्यातील एकूण शेतमालाची आवक व बाजारभाव :
शेतमाल **आवक (क्विंटलमध्ये)**किमान(रुपयांत)**कमाल (रुपयांत)

गहू **८५३ **२२००**२८००
ज्वारी**१४७**१७००**५२५१
बाजरी **१३३ **१७००**३२००
हरभरा**१३०**४००० ** ५२३०
तूर **०६९** ६२००**७२५०
मका**०९५**१५५०**१८५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घातपात, हलगर्जीपणा की गुन्हेगारी कृत्य... अजित पवारांच्या मृत्यूमागे नेमकं काय? पत्रकार परिषदेत सीआयडीनं कोणते संकेत दिले? वाचा...

हृदयस्पर्शी Video: फुटबॉल लागून 'SEAGULL' पक्षी कोसळला, खेळाडू त्वरित मदतीला धावला... CPR देऊन वाचवले प्राण...

Ajit Pawar Plane Crash: ''आम्हांला काही पुरावे सापडले आहेत'', अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी सीआयडीची पत्रकार परिषद

Explained : दक्षिण आफ्रिककडून वेस्ट इंडिजचा पराभव व्हावा, ही तर भारताची इच्छा! पण, का?

India Semi-Final Scenario: बापरे! भारताला तब्बल २९० धावांनी झिम्बाब्वेला हरवावं लागेल? नेमकं कसं आहे गणित, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT