अंबिका विद्युत कर्मचारी पतसंस्थेत १९ लाखांचा अपहार 
पुणे

दौंड - अंबिका विद्युत कर्मचारी पतसंस्थेत १९ लाखांचा अपहार

तत्कालीन चेअरमनसह एकूण पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रफुल्ल भंडारी

दौंड : दौंड तालुक्यातील अंबिका विद्युत कर्मचारी सहकारी पतसंथेत १९ लाख रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन चेअरमनसह एकूण पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दौंड पोलिसांनी या बाबत माहिती दिली. अंबिका विद्युत कर्मचारी पतसंस्थेचे तत्कालीन लेखनीक प्रभाकर रघुनाथ भदे (रा. शेडगाव, ता. श्रीगोंदा, जि. नगर), सचिव वसंत रूपा भिरूड (रा. पठारे वस्ती, लोहगाव, पुणे), चेअरमन संजय शिवाजी खळदकर (रा. केडगाव, ता. दौंड), प्रकाश नरसिंग भोसले (रा. खोपोडी, ता. दौंड) व उत्तम ज्ञानदेव गायकवाड (रा. खानोटे, ता. दौंड) यांच्याविरूध्द या प्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. १ एप्रिल २०१० ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत या पतसंस्थेचे लेखापरीक्षण व फेरलेखापरीक्षण करण्यात आले होते. लेखापरीक्षणात २८ सभासदांनी त्यांच्या कर्जखात्यामध्ये जमा करण्यासाठी वेळोवेळी संस्थेचे तत्कालीन लेखनिक प्रभाकर रघुनाथ भदे यांच्याकडे रोखीने भरणा केलेली १३ लाख ९९ हजार ७०८ रूपये त्यांनी संस्थेत जमा न करता त्याचा संगनमताने अपहार केल्याचे आढळून आले.

त्याचबरोबर बनावट दस्तऐवज तयार करून २४ सभासदांच्या नावावर तातडीचे कर्ज दिल्याचे धारक देय धनादेशाद्वारे (बेअरर चेक) बँकेतून परस्पर ५ लाख १५ हजार ५७० रूपये काढून घेण्यात आले होते. या बाबत जिल्हा विशेष लेखापरीक्षक मच्छिंद्र वडघुले यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार पाच संशयित आरोंपीविरूध्द भारतीय दंड विधान कलम ३४, ४०६, ४०९, ४२०, ४६७, ४६८ व ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूर्वाश्रमीचे महाराष्ट्र राज्य वीज मंडळ व आत्ताचे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे (महावितरण) अधिकारी व कर्मचारी या पतसंस्थेचे सभासद आहेत. या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसून दौंड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक तुकाराम राठोड पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT