पुणे

पिकअपच्या धडकेत दौंडमध्ये तरुणाचा मृत्यू

CD

दौंड , ता. ९ : दौंड शहरातून जाणाऱ्या अष्टविनायक मार्गावर झालेल्या रस्ते अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. दौंड पोलिसांनी आज (ता. ९) या बाबत माहिती दिली. स्वप्नील बाळासाहेब चोरमले (वय २८, रा. तामखडा, पाटस, ता. दौंड) असे त्या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी ( ता. ८) दुपारी शहरातील दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्यालयासमोरील रस्त्यावर हा अपघात झाला. स्वप्नील चोरमले हा देऊळगाव राजे येथून दौंड मार्गे पाटसकडे दुचाकीवर निघाला असता त्याला एका अज्ञात पीकअपने समोरून धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पिकअपचा चालक वाहनासह पसार झाला. दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी अक्षय कोळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: भेसळखोरांनो सावधान! दूध-पनीरनंतर आता मद्यावरही FDA वॉच ठेवणार; उत्पादन, लेबलिंगपासून भेसळीपर्यंत तपासणी होणार

Pune Dam Water : धरणे भरली, अन् चिंता मिटली; जिल्ह्यातील १३ धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक साठा

Pune Metro : पुणे मेट्रो ३ साठी मुहूर्तच मिळेना; सर्व स्थानके कार्यान्वित होऊन मेट्रो धावेपर्यंत मार्च २०२७ उजाडणार

Sadanand Date : पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान वापर करून गुन्ह्यांचा तपास करावा

Nashik earthquake: नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के; 3.8 रिश्टर स्केलची तीव्रता

SCROLL FOR NEXT