दौंड : कोणार्क एक्सप्रेस मधील प्रवाशांना लूटले  sakal
पुणे

दौंड : कोणार्क एक्सप्रेस मधील प्रवाशांना लूटले

दोन महिलांच्या गळ्यातील दीड लाख रूपयांचे दागिने लूटण्यासह चोरट्यांनी एका प्रवाशाला गंभीररित्या जखमी

प्रफुल्ल भंडारी

दौंड : मुंबई - भूवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस मधील दोन महिलांच्या गळ्यातील दीड लाख रूपयांचे दागिने लूटण्यासह चोरट्यांनी एका प्रवाशाला गंभीररित्या जखमी केले आहे. दौंड तालुक्यातील नानवीज रेल्वे फाटक जवळ रेल्वे सिग्नलच्या तारा तोडून एक्सप्रेस थांबविण्यात आली होती. दादर सेंट्रल येथून मुंबई - भूवनेश्वर (कोविड स्पेशल) कोणार्क एक्सप्रेस २६ ऑक्टोबर रोजी १ तास ३१ मिनिटांच्या विलंबाने धावत होती.

पुणे - दौंड लोहमार्गावर पाटस व दौंड रेल्वे स्थानकाच्या दरम्यान नानवीज रेल्वे फाटक जवळील आउटर सिग्नलच्या तारा तोडल्याने रात्री साडेआठ वाजता कोणार्क एक्सप्रेस थांबली होती. चोरट्यांनी एस १ या डब्ब्याच्या खिडकीतील मिनाक्षी शिवपुत्र गायकवाड (वय २५, रा. रामवाडी, सोलापूर) यांच्या गळ्यातील पासष्ट हजार रूपयांची एक सोनसाखळी ओढून घेतली. हा प्रकार पाहून मिनाक्षी गायकवाड यांचे बंधून राकेश गायकवाड हे डब्ब्यातून खाली उतरले व त्यांनी दोन चोरट्यांना पकडले. परंतु अन्य चोरट्यांनी दगडांचा जोरदार मारा केल्याने चोरटे निसटले. राकेश यांच्या पायाला जखम झाली असून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला.

तसेच एस - ४ या डब्ब्यातील खिडकीत बसलेल्या कल्पना विनायक श्रीराम ( वय ५९, रा. वालचंद कॅालेज जवळ, सोलापूर) यांच्या गळ्यातील ९० हजार रूपयांचे गंठण चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. चोरट्यांनी इंजिनवर देखील दगडफेक केली.सदर प्रकाराची माहिती मिळताच लोहमार्गचे सहायक निरीक्षक युवराज कलकुटगे घटनास्थळी रवाना झाले. रात्री ९ वाजून २८ मिनिटांनी एक्सप्रेस दौंड रेल्वे स्थानकात दाखल झाली.

जखमींवर प्रथमोपचार केल्यानंतर ९ वाजून ५६ मिनिटांनी एक्सप्रेस सोलापूर साठी रवाना झाली. दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्यात मिनाक्षी गायकवाड व सहप्रवाशांच्या फिर्यादीनुसार ३ ते ४ अज्ञात चोरट्यांविरूध्द जबरी चोरी व रेल्वे सिग्नलच्या तारा तोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार ताराचंद सुडगे पुढील तपास करीत आहेत. दौंड लोहमार्ग पोलिस दल व दौंड पोलिसांच्या वतीने घटनास्थळ आणि परिसरात चोरट्यांच्या शोधासाठी मोहिम राबविण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT