Somnath-Abhang 
पुणे

'दौंड पोलिसांनी माझी टू व्हीलर परत केली, हाच माझा दिवाळी बोनस'

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) - दौंड पोलिसांनी माझी चोरीस गेलेली टू व्हीलर परत केली हाच माझा दिवाळी बोनस आहे, अशी भावना सोमनाथ अभंग यांनी व्यक्त केली आहे. चार वर्षांपूर्वी चोरीस गेलेली दुचाकी पोलिसांकडून परत मिळाल्यानंतर त्यांनी ही भावना व्यक्त केली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यातील दत्तवाडी येथे सोमनाथ वामन अभंग यांची लॅान्ड्री असून त्यांनी पै - पै जोडून टीव्हीएस स्पोर्ट ही टू व्हीलर घेतली होती. २०१६ मध्ये बिबवेवाडी येथून त्यांची ही दुचाकी चोरीस गेल्यानंतर त्यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. परंतु आपली टू व्हीलर आता कधी परत मिळणार नाही, अशी धारणा करून त्यांनी त्याचा विचार सोडून दिला होता. 

दरम्यान दौंड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या बेवारस वाहनांची नोंद घेत इंजिन व चासी क्रमांकाच्या आधारे कारकून बापू रोटे यांनी वाहनाच्या मूळ मालकांची शोध मोहिम सुरू केली. मागील आठवड्यात सदर विना क्रमांकाची टू व्हीलर सोमनाथ अभंग यांची असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना मूळ कागदपत्रे सादर करून वाहन घेऊन जाण्यासंबंधी नोटीस पाठविण्यात आली. नोटीस मिळताच कागदपत्रांसह सोमनाथ अभंग दौंड पोलिस ठाण्यात दाखल झाले.

पडताळणी झाल्यानंतर दौंडचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या उपस्थितीत बापू रोटे यांनी सोमनाथ अभंग यांना त्यांच्या टू व्हीलरचा ताबा दिला. चोरीस गेलेली टू व्हीलर कोणतीही आडकाठी न आणता दिवाळीच्या तोंडावर परत मिळाल्याचा आनंद सोमनाथ अभंग यांच्या चेहर्यावर होता व त्यांनी दौंड पोलिसांचे त्याकरिता मनापासून आभार मानले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon : दुचाकी, कार अन् बसचा भीषण अपघात, कारमधील ५ जणांसह ६ जणांचा मृत्यू, चिमुकला बचावला

Latest Marathi News Update : मंत्री नरहरी झिरवळ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या भेटीला

Nepal Banned India Mango : जपाननंतर नेपाळचाही भारताला धक्का ! आंब्याच्या आयातीवर घातली बंदी, सांगितले 'हे' मोठे कारण

Weather Alert: पुढील ४८ तास सतर्क राहा! अहिल्यानगर जिल्ह्यास ‘यलो अलर्ट’; दोन दिवस वादळी पाऊस अन् विजांच्या कडकडाटाचा इशारा

Amravati: शेतकरी कर्जमाफी योजनेत त्रुट्याच त्रुट्या; सुधारणा न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन, आमदार बच्चू कडूंचा इशारा

SCROLL FOR NEXT