Daund Railway Junction
Daund Railway Junction sakal
पुणे

Daund Railway Junction : दौंड रेल्वे जंक्शन स्थानक सोलापूरऐवजी पुणे रेल्वे विभागात समाविष्ट

सकाळ वृत्तसेवा

दौंड : केंद्र सरकारने दौंड रेल्वे जंक्शन या स्थानकाचा सोलापूरऐवजी पुणे रेल्वे विभागात समाविष्ट करण्यास मंजुरी दिल्याबद्दल दौंड शहर भाजपच्या वतीने प्रवाशांना पेढे भरवून आनंद साजरा केला. दौंड रेल्वे स्थानकात गुरुवारी (ता. २२) भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे दौंड शहराध्यक्ष स्वप्नील शहा- सराफ यांनी प्रवाशांना पेढे भरविले.

दौंड रेल्वे जंक्शन या स्थानकाचा सोलापूरऐवजी पुणे रेल्वे विभागात समाविष्ठ करण्याची अनेक वर्षांची प्रलंबित मागणी होती. केंद्र सरकारने बुधवारी (ता. २१) एका अधिसूचनेद्वारे दौंड जंक्शनचा पुणे विभागात समावेश करण्यास मंजुरी दिली. त्यामुळे दौंड- पुणे- दौंड दैनंदिन प्रवास करणारे प्रवासी, नागरिक, रेल्वेचे अधिकारी, रेल्वे पेन्शनर्स, वाहतूकदार, आदींना त्याचा फायदा होणार आहे. प्रवासी, रेल्वे आणि नागरिकांच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल भाजपकडून प्रवाशांना पेढे भरविण्यात आले. दौंड रेल्वे जंक्शनचा पुणे विभागात समावेश करण्यासंबंधी निर्णयाची एक एप्रिल २०२४ पासून अंमलबजावणी होणार आहे.

केंद्रिय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचे या निमित्त दौंडकरांच्या वतीने आभार मानण्यात आले. भाजपचे केंद्रातील सरकार नुसते शब्द देत नाही, तर दिलेला शब्द पूर्ण करीत असल्याची माहिती स्वप्नील शहा यांनी यावेळी दिली. जावेद सय्यद, ओंकार कड्डे, शिवाजी जाधव, ओम शेलार, ओम व्हंकाडे, साईनाथ नायकर, आदी या वेळी उपस्थित होते.

सुप्रिया सुळे यांनी मानले रेल्वेमंत्र्यांचे विशेष आभार

दौंड : केंद्र सरकारने दौंड रेल्वे स्थानकाचा सोलापूरऐवजी पुणे विभागात समाविष्ट करण्यास मंजुरी दिल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे विशेष आभार मानले. दौंड-पुणे लोहमार्गावर पाटस (ता. दौंड) स्थानकाच्या आधी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाची हद्द सुरू होते, मात्र दौंड स्थानकाचा सोलापूर विभागात समावेश आहे. दौंड- सोलापूर- वाडी आणि दौंड- नगर- येवला (जि. नाशिक) पर्यंतच्या मार्गांचा सोलापूर रेल्वे विभागात समावेश आहे. दौंडवरून जाणाऱ्या पुणे- दौंड- बारामती रेल्वे खंडाचा पुणे विभागात समावेश आहे.

सध्या दौंड स्थानकावर सोलापूर व पुणे विभागाचे दुहेरी नियंत्रण आहे. दौंडपासून सोलापूर रेल्वेस्थानकाचे अंतर १८७ किलोमीटर; तर पुण्याचे अंतर अवघे ७५ किलोमीटर आहे. प्रशासकीय, भौगोलिक, आर्थिकदृष्ट्या प्रवासी आणि नागरिकांना सोलापूर पेक्षा पुणे विभाग सोईचा असल्याने प्रशासनाने दौंडचा समावेश पुणे विभागात करण्याची मागणी खासदार सुळे यांनी सातत्याने केली होती. लोकसभेच्या अधिवेशनात यासंबंधी प्रश्न उपस्थित करून त्यांनी त्यासंबंधी सतत पाठपुरावा केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

मोठी बातमी! हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा मृत्यू

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: राजेश पाटलांनी केले मतदान

SCROLL FOR NEXT