पुणे

दौंड रेल्वे स्थानकावर दागिन्यांच्या पर्सची चोरी

CD

दौंड, ता. १८ : दौंड रेल्वे स्थानकावर महिला प्रवाशाची पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असलेली पर्स चोरीला गेली. ही घटना शनिवारी (ता. १६) पहाटे घडली. शारदा अर्जुन राजगुरू (रा. काटेवाडी, ता. बारामती) या मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेसने दौंड स्थानकावर बारामतीकडे जाण्यासाठी उतरल्या होत्या. बारामतीकडे जाणाऱ्या गाडीला वेळ असल्याने त्या पतीसह फलाट क्रमांक ४ वर थांबल्या होत्या. दरम्यान, शारदा पहाटे पावणेचार वाजता मोबाइल ठेवण्यासाठी पर्स शोधत असताना त्यांना ती चोरीस गेल्याचे लक्षात आले. या पर्समध्ये पाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, हार, पदक, कर्णफुले व नथ आणि चांदीचे दागिने होते. चोरीस गेलेल्या दागिन्यांचे मूल्य तीन लाख २७ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LinkedIn Layoffs: लोकांना नोकरी देणाऱ्या कंपनीतच मोठी नोकरकपात! Meta नंतर LinkedIn चा कर्मचाऱ्यांना झटका; कारण काय?

Maharashtra Rain: मेघगर्जनेसह सरी कोसळणार! उन्हापासून दिलासा मिळणार, 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

कॉकरोच जनता पार्टीची देशभरात हवा, फक्त २ दिवसात ४० हजार सदस्य; जाहीरनामा वाचून थक्क व्हाल, कुणी केलं सुरू?

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात साडेचार हजार मेडिकल बंद

Thane News: 'मराठी'मध्ये १४२ रिक्षाचालक नापास, विशेष मोहिमेत २,३१७ अमराठी चालकांची तपासणी

SCROLL FOR NEXT