दौंड शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. sakal
पुणे

दौंड - ईद निमित्त राष्ट्र विकासाकरिता प्रार्थना

दौंड शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

प्रफुल्ल भंडारी

दौंड : दौंड शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ईद निमित्त राष्ट्र विकासाकरिता सामुहिक प्रार्थना करण्यात आली. शहरात रमजान ईद निमित्त सकाळी भीमा नदीकाठी असलेल्या ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यासाठी पारंपरिक वेशात अबालवृध्द मोठया संख्येने उपस्थित होते. सामुहिक नमाज पठणानंतर मौलाना मोहमद शमशाद कादरी यांनी धर्मसंदेश देण्यासह राष्ट्राच्या समृध्दी, सुरक्षा आणि सुयशाकरिता विशेष सामुहिक प्रार्थना केली. राष्ट्रात सौहार्दपूर्ण वातावरण कायम राहणे आणि परस्परांमध्ये निकोप प्रेम वाढण्यासह अपप्रवृत्तींपासून लांब ठेवण्याकरिता याचना करण्यात आली. त्याचबरोबर बेरोजगारांना रोजगार, आजारी नागरिकांना चांगले स्वास्थ्य आणि अडचणीत असलेल्या नागरिकांची समस्येतून सुटका व्हावी याकरिता प्रार्थना करण्यात आली. नमाज नंतर मुस्लिम बांधवांनी दफनभूमीत जाऊन आप्त व स्वजनांच्या थडग्यांवर फुले वाहून आदरांजली वाहिली.

परस्परांना आलिंगन देत ` ईद - मुबारक ` म्हणत शुभेच्छा देण्यात आल्या. राजकीय पक्ष व संघटनांचे पदाधिकारी, पोलिस उप अधीक्षक राहुल धस, निरीक्षक विनोद घुगे, आदी या वेळी ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samanvay Cafe: आरोग्यदायी डाएट अन् बनारसी कचोरी-जलेबीचा आस्वाद; चहाच्या घोटासोबत सुधारणार पोलीस-जनता 'संबंध'

Success Story: वयाच्या १७ व्या वर्षी उंचावली देशाची मान ! खेडेगावातील प्रणवला मिळाली ३.५५ कोटींची स्कॉलरशिप; गणितात ठरलाय 'वर्ल्ड टॉपर'

BADMINTON: ठाण्याच्या या बॅडमिंटन अकादमीची चर्चा थेट परदेशात! मालदीव, आयर्लंड, स्पेन अन् अमेरिकेतील खेळाडू प्रशिक्षणासाठी इथेच का येतात?

Marathi News Live Updates : सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आठ खासदार आज पंतप्रधान मोदींची घेणार भेट

Chhatrapati Sambhajinagar Airport Recruitment: विमानतळ भरतीच्या नावाखाली संभाजीनगरमध्ये विद्यार्थी वेठीस; परीक्षा घेणारेच गायब; केंद्रावर सोयी-सुविधांचाही अभाव

SCROLL FOR NEXT