पुणे

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दौंडमध्ये कामगाराची लूट

CD

दौंड, ता. २६ : दौंड कॅार्ड लाईन रेल्वे स्थानकाकडे पायी निघालेल्या एका कंपनी कामगाराला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून मारहाण करत २७,९०० रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना घडली आहे. १३ जून रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास दौंड शहरातील गोल राउंड परिसरात हा प्रकार घडला.
कुरकुंभ एमआयडीसीमधील एका खासगी कंपनीत काम करणारे प्रशांत पांडुरंग हरमकर (वय २३, रा. खामगाव, जि. बुलढाणा) हे रेल्वेने मूळ गावी जाण्यासाठी दौंड शहरातील गोल राउंड येथे उतरले होते. दौंड कॉर्ड लाइन रेल्वे स्थानक तेथून ४ किलोमीटर अंतरावर असल्याने ते पायी निघाले होते. दरम्यान, दुचाकीवरून आलेल्या दोन तरूणांनी त्यांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीवर बसवले. पुढे अंधारात नेऊन तिसऱ्या साथीदारासह तिघांनी प्रशांत हरमकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. चोरट्यांनी त्यांच्याजवळील मोबाईल, रोख रक्कम, एटीएम कार्ड आणि ओळखपत्रे, असा एकूण २७ हजार ९०० रुपयांचा ऐवज लुटून नेला. या प्रकरणी मंगळवारी (ता. २३) दौंड पोलिस ठाण्यात प्रशांत हरमकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तीन अज्ञातांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress High Command Alert : काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय! सर्व आमदार-खासदारांना तातडीने दिल्लीला बोलावले...

Ranji Trophy 2026: ठरलं तर मग ! उद्यापासून रणजी ट्रॉफीचा थरार सुरू; ३८ संघांमध्ये चुरस, तुमच्या आवडीच्या टीमचा सामना कधी? वाचा संपूर्ण शेड्युल!

Marathi News Live Updates : पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनबाहेर CJP कार्यकर्त्यांचं आंदोलन

सोनाली बेंद्रेला 'अगं बाई अरेच्चा!' या चित्रपटातील 'छम छम' गाण्यासाठी किती पैसे मिळाले? म्हणाली, 'केदार शिंदेने...'

Kaygaon News : गंगापूर तालुक्यावर दुष्काळाचे सावट! चारा छावण्यांसाठी प्रशासनाची धावपळ; शेतकऱ्यांचे लक्ष प्रत्यक्ष मदतीकडे

SCROLL FOR NEXT