SLC26B30611
फोटोओळ :
सोलापूर : ‘पहाटगाणी – डॉक्टर्स फॉर डॉक्टर्स’ कार्यक्रमात सहभागी डॉक्टर.
डॉक्टरांच्या सुरांनी उजाडली ‘सुरेल पहाट’!
‘डॉक्टर्स फॉर डॉक्टर्स’ उपक्रमाला ज्येष्ठांसह तरुण डॉक्टरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ६ : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) सोलापूर शाखेतर्फे ‘पहाटगाणी – डॉक्टर्स फॉर डॉक्टर्स’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी (ता. ६) पहाटे आयएमए हॉलमध्ये करण्यात आले. डॉक्टरांनी सादर केलेल्या सुरेल गीतांनी पहाटेची मैफल रंगली.
कार्यक्रमात आयएमए सिंगर्स या समूहातील डॉक्टरांनी विविध गीते सादर करून रसिकांची दाद मिळवली. त्यांना पेटीवर नागेश नागेशी, तबल्यावर ओंकार कुलकर्णी, पखवाजवर संभाजी घुले, ऑक्टोपॅडवर शाम नाईकनवरे आणि सिंथेसायझरवर जब्बार मुर्शीद यांनी साथ दिली. डॉ. अंजली शिवपूजे यांनी खुमासदार शैलीत निवेदन केले.
आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय मंठाळे म्हणाले, ‘पहाट म्हणजे केवळ वेळ नसून ती एक भावना आहे. पहाटेचा सूर हा देवाचा श्वास असतो. तबल्याचा पहिला ‘धा’ जेव्हा पहाटेच्या शांततेत उमटतो, तेव्हा अख्खे जग जागे होते.’
कार्यक्रमाला आयएमएचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र अग्रवाल, सचिव डॉ. लक्ष्मण अहिरसांग, डॉ. नंदिनी बिराजदार, खजिनदार डॉ. निशिकांत मस्के यांच्यासह शहरातील ज्येष्ठ आणि तरुण डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.