Pune Leopard sakal
पुणे

Pune Leopard : आम्ही जगायचं तरी कसं? ; जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यात दिवसेंदिवस वाढ

जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. बिबट्या ही समस्या आता केवळ जीवघेणी ठरू लागली आहे. राज्य व केंद्र सरकारकडून बिबट्यांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची ठोस पावले उचलली जात नसल्याने आता नागरिकांनी जगायचं कसं, असा प्रश्न जुन्नरकरांसमोर निर्माण झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

खोडद : जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. बिबट्या ही समस्या आता केवळ जीवघेणी ठरू लागली आहे. राज्य व केंद्र सरकारकडून बिबट्यांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची ठोस पावले उचलली जात नसल्याने आता नागरिकांनी जगायचं कसं, असा प्रश्न जुन्नरकरांसमोर निर्माण झाला आहे.

काळवाडी येथील एका बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली आहे.राज्य व केंद्र शासनाच्या उदासीन धोरणांमुळे बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून यात नागरिकांचे बळी जात आहेत.बिबट्यांचे हल्ले टाळण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी आता जुन्नर तालुक्यातून जोर धरू लागली आहे.

जुन्नर तालुक्यात बिबट्यांचे हल्ले टाळण्याच्या दृष्टीने बिबट्यांच्या संख्येत होत असलेली वाढ रोखण्यासाठी जुन्नर वन विभागाने शासनाला जानेवारी २०२४ मध्ये काही उपाययोजना करण्यासाठी प्रस्ताव पाठवले आहेत. वरिष्ठ पातळीवर या उपाययोजनांवर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. बिबट्यांच्या समस्येमुळे शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे.भारनियमनामुळे शेतकऱ्यांना अनेकदा रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरणी करण्यासाठी जावे लागते. मात्र बिबट्यांचा वाढता वावर पाहून शेतकरी शेतात देखील जात नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनावर देखील परिणाम झाला आहे.

राज्य व केंद्र सरकारच्या उदासीन धोरणामुळे आतापर्यंत अनेकांचे बळी गेले आहेत. बिबट्यांचे हल्ले कमी करण्यासाठी काही उपाययोजना करता येत नसतील तर बिबट्यांना ठार मारण्याची परवानगी तरी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना द्यावी. बिबट्यांच्या बाबतीत राज्य व केंद्र सरकार जेव्हा उपाय करतील तेव्हा करतील, पण परिसरातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी तोपर्यंत आपापल्या मुलाबाळांची व स्वतःची काळजी घ्यावी, अशी मागणी माउली खंडागळे यांनी केली.

समस्या सोडविण्यासाठी इच्छाशक्तीची गरज

बिबट्यांची ही समस्या सोडविण्यासाठी आता राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. राज्य व केंद्र सरकार बिबट्यांच्या बाबतीत कधी निर्णय घेईल, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत असला तरी जुन्नरकरांना मात्र स्वतःचा जीव मुठीत धरून जीवन जगावे लागत आहे. राज्यकर्ते बिबट्यांच्या या गंभीर समस्येबाबत काही ठोस निर्णय घेतील काय आणि जुन्नरकर यांचा जीव वाचवतील काय, असा प्रश्न सध्या व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर ट्राफिक, हजारो उड्डाणे रद्द; जगभरातील विमानसेवेला फटका, विमानतळांवर प्रवाशांची गर्दी

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Smart Meter Fire Uchgaon : उचगावमध्ये नवीन स्मार्ट मीटरने घेतला पेट; पहाटे घडलेल्या घटनेमुळे खळबळ, स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT