farmer 
पुणे

शेतकऱ्यांसाठी खूशखबर, दौंडमध्ये मुगाचे दिवसाआड लिलाव 

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : दौंड तालुक्यातील केडगाव येथे शेतकऱ्यांच्या हितासाठी मुगाचे लिलाव दिवसाआड सुरू करण्यात आल्याची माहिती दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रेय पाचपुते यांनी दिली.

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दौंड तालुक्यासह शेजारील शिरूर व अन्य तालुके आणि नगर जिल्ह्यातील मूग उत्पादक विक्रीसाठी येतात. यंदा चांगले पर्जन्यमान आणि कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर कडधान्यांच्या मागणीत झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर मुगाची मोठी आवक अपेक्षित आहे. मुगाची संभाव्य आवक विचारात घेऊन बाजार समितीच्या वतीने केडगाव उपबाजारात व्यापाऱ्यांसमवेत एक बैठक घेण्यात आली. बैठकीत मूग उत्पादकांच्या हितासाठी दिवसाआड लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यापाऱ्यांसह समितीचे उपसभापती संपत निंबाळकर, ज्येष्ठ संचालक माणिक राऊत, रामदास चौधरी, राजू जगताप, बाजार समिती सचिव तात्यासाहेब टुले, आदी या वेळी उपस्थित होते.

या निर्णयानुसार केडगाव येथे मंगळवार, गुरूवार, शनिवार, सोमवार व पुन्हा मंगळवार (आठवडे बाजार दिवस), असे लिलाव होणार आहेत. चालू आठवड्यात १० ऑगस्ट रोजी केडगाव उपबाजारात मुगाची ३३२ आवक होऊन त्यास प्रति क्विंटल किमान ४२०० व कमाल ७००० रूपये इतका भाव मिळाला आहे. बाजार समितीच्या वतीने मुगासाठी आधारभूत शेतमाल केंद्राकरिता (संचयन) प्रस्ताव पाठविल्याची माहिती तात्यासाहेब टुले यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेच्या जागावाढीमागे मोदींचं नेमकं राजकारण काय? महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

Gold Rate Today: लग्नसराईपूर्वी सोन्याचे भाव कोसळले! 40 मिनिटांतच मोठी घसरण; 11 महिन्यांतील सर्वात स्वस्त भाव; तुमच्या शहरातील दर पाहा

Vikalp Tiwari Century: २१ चेंडूंत ९० धावा... १७ वर्षाच्या पोराचा मैदानात धुमाकूळ, ठोकलं शतक अन् वैभव सूर्यवंशीनंतर T20त नोंदवला भारी पराक्रम Video

Latest Marathi News Live Update : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या इमारतीवर अखेर मुंबई महापालिकेचा बुलडोझर

Satara District Bank Election: सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचा आग्रह; फडणवीस कोणाच्या नावाला पसंती देणार?

SCROLL FOR NEXT